#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे (नेरदवाडी) येथील जळीत गोठ्याची आ. शेखर निकम यांनी तातडीने दखल घेत पाहणी केली


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव  
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील पाचांबे (नेरदवाडी) येथे आता चालू असलेल्या सततधार विजकडाक्यासह पडत असणाऱ्या पाऊसात  रात्री येथील शेतकरी संजय जाधव यांच्या गुरांच्या गोठ्यावर वीज पडली.  त्यामध्ये १३ गूरे, ६ म्हैशी, २ रेडे, ५ रेडकं जळूण मृत पावल्या यामध्ये त्यांचे अंदाजे रु. ११लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे. याची आमदार शेखर निकम यांनी दखल घेऊन प्रत्यक्ष पहाणी केली. 

गोठ्यातील जळूण मृत पावलेली गुरे बघून ही खूपच दु:खदायक अन वेदनादायक घटना आहे असे मत व्यक्त केले. मात्र यावेळी कोणतीही मनुष्यहानी  झाली नाही.  हतबल झालेले शेतकरी  संजय जाधव यांना धीर दिला व तातडीने  मदत केली. याबाबत शासकिय यंत्रणेला योग्य त्या सुचना करून तत्परतेने शासकीय मदत व्हावी असे संबंधित अधिकारी यानां सांगण्यास आले.

यावेळी सरपंच संदेश घाडगे, शाम घाडगे, विनोद मस्के, विनोद ताठरे प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम