#Pune:आषाढी एकादशीनिमित्त वनाझ परिवार विद्यामंदिरमध्ये अभंग गायन स्पर्धा
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
विद्यार्थ्यांना शिक्षण तर आवश्यक आहेच परंतु शिक्षणासोबतच सण, संस्कृती,परंपरांचे रक्षण करणे व त्यांचे महत्व जाणून घेणे हे देखील राष्ट्रहिताच्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे ठरते.असाच वैष्णवांचा/ वारकऱ्यांचा जणू काही कुंभमेळा ठरावा असा हा आषाढी एकादशीचा पंढरपूर नगरीतील उत्सव आज आमच्या वनाज परिवार विद्या मंदिर कोथरूड शाळेमध्ये अभंग गायन स्पर्धेच्या निमित्ताने सजला होता. इ.१ली ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधून शाळेतील स्पर्धा समितीचे प्रमुख श्री दीपक राऊत सर सौ. अश्विनी चव्हाण व संगीता चव्हाण या शिक्षकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अनिता दारवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ९/७/२०२२ रोजी अभंग गायन स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेसाठी सर्व शिक्षकांनी मुलांकडून उत्साही वातावरणात अभ्यासाला जोडून तयारी करून घेतली. तसेच सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखात, हातात टाळ, मुली डोक्यावर तुळस घेऊन अभंग म्हणत होत्या. " चाले हे शरीर कोणाचिये सत्त कोणा बोलविते हरी विण ! देखवी दाखवी एक नारायण तयाचे भजन चुको नका!!
अभंग गायन स्पर्धेला लाभलेले परीक्षक संगीत शिक्षिका सौ सिद्धी ताटके,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता दारवटकर व उपमुख्याध्यापिका सौ नीता जाधव यांनी स्पर्धेचे परीक्षण करून उत्साही वातावरणात स्पर्धेचा निकालही जाहीर केला व सर्व मुलांचे व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.
Comments
Post a Comment