#Chiplun:चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाय-योजनांचा आमदार शेखर निकम यांनी घेतला आढावा


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण शहरात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास चिपळूण नगरपरिषदेच्या वतीने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी केलेल्या उपाय-योजनांचा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा आमदार शेखर निकम सर यांनी आढावा घेऊन नगरपरिषद  विभागानुसार आपत्तीव्यवस्थापन पथकांची माहिती घेतली तसेच नगरपरिषदेने अद्यावत तयार करुन ठेवलेल्या बोटींची पहाणी करुन बोटींच्या केलेल्या नियोजनाबाबत चर्चा केली व चिपळूणमध्ये दाखल झालेल्या NDRF पथकाशी संवाद साधून त्यांचे स्वागत केले.

गत २०२१ वर्षी झालेली भीतीदायक अशी पुर परिस्थिती पहाता आपण अधिक सतर्कता बाळगत चिपळूणमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे जरी नियोजन केले असले तरी पुर परिस्थिती निर्माण होवूच नये असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त करत  ईश्वरास केली प्रार्थना. यावेळी मुख्य-कार्यकारी अधिकारी प्रसाद शेगडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मिलिंद कापडी, शिरिष काटकर, बापूशेठ काणे, अरुणशेठ भोजने, प्रशासकीय अधिकारी अनंत मोरे, प्रमोद ठसाळे, NDRF प्रमुख व नगरपरिषदेचे विभागानुसार आपत्ती विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम