प्रति पंढरपूर -- दौंड हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणारे डाळिंब विठलं बन हे या भागातील प्रति पंढरपूर म्हणून प्रख्यात आहे
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून वारकरी भाविक भक्ताचे तीर्थ स्थान ओळख असणाऱ्या डाळिंब बन येथील यात्रेची तयारी पूर्ण झाल्याचे देवस्थान समितीने नमूद केले आहे.
डाळिंब बन येथील विठलं बन आशाडी एकादशीला विठलं दर्शनासाठी दीड ते दोन लाखाहून अधिक भाविक आणि भक्तगण दर्शनासाठी येत असतात.
यासाठी वेळेत आणि सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी, देउळ आणि सम्पूर्ण परिरासारची साफ सफाई, पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य वीज, दळण वळण या सर्व त्या सुविधेचा पूर्तता करण्यात आली आहे.
विठलाची महापूजा पहाटे आमदार संजय जगताप, आमदार राहुल कुल यांचे हस्ते होणार आहे,याचे हस्ते करण्यात येते, यानंतर सभामंडपात मान्यवर आणि उपस्थिय यांचा विठलं बन देवस्थान याचे वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
खेळण्याची , मिठाईची दुकाने, पाळणे यासाठी व्यवस्था केली आहे, उरुळी कांचन येथून बसची सुविधा देण्यात येणार आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी याचा लाभ घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी केले आहे.
प्रति पंढरपूर -- दौंड हवेली आणि पुरंदर या तीन तालुक्याच्या सीमेवर असणारे डाळिंब विठलं बन हे या भागातील प्रति पंढरपूर म्हणून प्रख्यात आहे
0 Comments