#Malshiras::मा.राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही वाटप


महादरबार न्यूज नेटवर्क -
हिंदू जननायक राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा गिरवी ता. माळशिरस  यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरवी व वाड्या वस्तीवरील सर्व शाळांना मोफत वही वाटप  करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना दरवर्षी हा उपक्रम वेगवेगळ्या गावांमध्ये राबवत असते त्याचाच एक भाग म्हणून  गिरवी ता. माळशिरस गावामध्ये हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.
 त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे ,कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसेचे नगरसेवक माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे तसेच गिरवी गावचे सरपंच सोमनाथ मदने, गिरवी गावचे उपसरपंच राजाभाऊ नरूटे, मनसेचे तालुका सचिव लक्ष्मण नरूटे, गिरवी गावचे माजी उपसरपंच व मनसे शेतकरी सेनेचे तालुका कार्याध्यक्ष राजाभाऊ तांबवे, गिरवी गावचे शाखाध्यक्ष सुभाष नरूटे, शाखा उपाध्यक्ष विजय मदने, शेखर कोकरे, लाला जाधव, तानाजी नरूटे, अवि सावंत, जयराम नरूटे, समाधान पडळकर, ढोबळे गुरुजी, पवार गुरुजी, गायकवाड गुरुजी, खरंगले गुरुजी, पुराने गुरुजी, श्रीमती ओव्हाळ मॅडम, श्रीमती कुलकर्णी मॅडम, सायबु दनाने, जयराम गोपने गुरुजी यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होता ते सर्व बाल विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या समवेत हा कार्यक्रम संपन्न झाला.
                                                                           यावेळी बोलताना मनसे माढा लोकसभा अध्यक्ष अप्पासाहेब कर्चे म्हणाले आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात कोणताही डिजिटल बॅनरबाजी न करता करत असतो प्रत्येक महाराष्ट्र सैनिक राज साहेबांच्या शिकवणीप्रमाणे २० टक्के राजकारण ८० टक्के समाजकारण करीत असतो त्याचाच एक भाग म्हणून सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिकता यावे त्याच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून काहीतरी त्याला भेट देता यावी म्हणून हा उपक्रम मनसेचे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी तालुक्यामध्ये वेगवेगळ्या गावात हा उपक्रम करीत असतो तसेच गिरवी गावातील सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक ही यावेळी करण्यात आले.

                       Advertisement 

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम