#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मध्ये आय.आय.टी फाउंडेशन कोर्सचे थाटात उद्घाटन


महादरबार न्यूज नेटवर्क -
मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” या शाळेत दि. ११ जूलै २०२२ रोजी‌ आय.आय. टी फाऊंडेशन कोर्स चे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शाळेत मोरोची व नातेपुते परिसरातील एस.एस.सी. बोर्ड परिक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर,  दहावीला यश संपादन केलेले विद्यार्थी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. आय.आय.टी. फाऊंडेशन कोर्सचा उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला. आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी जावे लागते. सर्वांना ते शक्य होत नाही यासाठी काहीतरी केले पाहिजे असे संस्थेचे चेअरमन डॉ दत्तात्रय निटवे सर यांना वाटत असे यातुनच ही कल्पना सुचली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मीळावे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यी स्पर्धेच्य  युगात कुठेही कमी पडुन नये असे डॉ. निटवे सर यांचे मत आहे.  

सदर कार्यक्रमास पंचक्रोशीतील विद्यार्थी व पालकांचा मोठं प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी  या कोर्स विषयी बोलताना सांगितले कि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनसाठी हि एक  सुवर्ण संधी आहे याचा लाभ अनेक विद्यार्थ्यांनी घ्यावा व आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावा.
हा कार्यक्रम विद्यालयाचे प्रिन्सिपल ताहेर शेख सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी साजरा केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी , संचालक मंडळ व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत