#Yavat: विठ्ठला भरपूर पाऊस दे - आमदार संजय जगताप


महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
गेली दोन वर्षे आरोग्याच्या  दृष्टीने अतिशय वाईट गेली आहेत, यावर्षी प्रथम आरोग्य सम्पदा आणि पाउस हे दोन्ही भरपूर प्रमाणात द्यावी, अशी मी विठलं चरणी प्रार्थना केली आहे, असे प्रतिपादन पुरंदरचे आमदार संजय जगताप यांनी डाळिंब विठलं बन येथे बोलताना केले आहे.
प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या विठलं बन येथील विठलाची महापूजा पुरंदरचे आमदार संजय जगताप आणि त्यांच्या सुविद्य पत्नी राजवर्धिनी जगताप यांचे हस्ते आयोजित करण्यात आली होती.

आमदार जगताप पुढे म्हणाले, मी सोपानं नगरी सासवड येथे राहतो,विठलंबन आणि सोपानं नगरीची  भावनिक आणि भक्तीची नाळ आहे,त्यामुळे येथे येण्याची ओढ वाटते, आणि येथे येऊन दर्शन घेतल्यावर आत्मिक समाधान लाभते.

मी पुरंदरचा आमदार आहे त्यामुळे मी येथे आलो तरी मला निधी देत येत नाही, तरीही येथे येण्याची ओढ लक्षात घेऊन मी माझे वडील स्व, चंदूकाका जगताप यांचे स्मरणार्थ  ५  लाख रुपये देवस्थान विकास कामास देत आहे.
आमदार संजय जगताप.

यावेळी बोलताना दौंडचे आमदार राहुल कुल म्हणाले, डाळिंब बन आणि परिसराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे, दौंड आणि पुरंदर पाण्याबाबत आमदार जगताप यांनी सहकार्य भूमिका घ्यावी, यापुढेही येथील विकासाला प्राधान्य देण्यात येईल.

याप्रसंगी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचेही भाषण झाले.

या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य कीर्ती काचंन, हवेळीच्या माजी सभापती हेमलता बडेकर, माजी जि,प, सदस्य महादेव कांचन, दौंड पंचायत सदस्य सुशांत दरेकर, नितीन दोरगे, दौंड कांग्रेस चे अध्यक्ष विठलं खराडे,  उरुळी कांचन सरपंच राजेंद्र बबन कांचन, जेष्ठ नेते माउली कांचन, रामदासभाई चौधरी, भाऊसाहेब कांचन या मान्यवर यांचेसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकरते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते,  प्रास्तविक देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र काचंन, आभार सचिव तानाजी म्हस्के तर सूत्र संचालन लक्षीमन म्हस्के यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत