#Natepute:ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची सी.बी.एस.ई. दहावीचा निकाल १०० टक्के
महादरबार न्यूज नेटवर्क -
मोरोची तालुका माळशिरस येथील ‘दर्या प्रतिष्ठान’ संचलित Dr. Nitave’s “ ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल , मोरोची” शाळेचा सी.बी.एस.ई. बोर्डाचा निकाल शंभर टक्के लागला.
सी.बी.एस.ई. बोर्डाची में महिन्यात परिक्षा घेण्यात आली होती. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल मोरोची या शाळेची इयत्ता दहावी ची पहिली बॅच होती. बोर्डाने आज निकाल जाहीर केला यामध्ये विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला.
शाळेतील टॉप फाईव्ह अनुक्रमे यशस्वी विद्यार्थी कु.समृद्धी रुपनवर ९४.६०, कु प्रतिक्षा कर्चे ८५.८०, कु. गितांजली वाघमोडे ७६. ४०, चि.सुशांत पालवे ७२ . व चि. सागर पाटील ७१.६० गुण मिळवले आहेत.
संस्थेचे चेअरमन मा. डॉ.दत्तात्रय निटवे सर, सेक्रेटरी डॉ. योगिता निटवे मॅडम, संस्थेचे संचालक , विद्यालयाचे प्राचार्य ताहेर शेख सर , उपप्राचार्य जीलानी आतार सर व विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मोरोची व परिसरातील लोकांकडून तसेच पालकांकडून ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन तसेच सर्व शिक्षक यांनी चांगले लक्ष देऊन शाळेचा निकाल चांगला लावल्याने यशस्वी विद्यार्थ्यांसह यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment