#Natepute:आ. राम सातपुते यांच्या सहकार्याने पुनम वाघमोडे यांचे आठ लाख रुपयांचे ऑपरेशन झाले मोफत
महादरबार न्यूज नेटवर्क -
गिरवी ता. माळशिरस येथील बापू अर्जुन वाघमोडे व त्यांचे कुटुंबीय अल्पशा शेत जमिनीवर उदरनिर्वाह करणारे हे कुटुंब त्यांची कन्या पुनम वाघमोडे ही सुरुवातीपासूनच दोन्ही खुब्याचे बॉल निकामी असल्याने चालताना त्रास व्हायचा परंतु ऑपरेशन करण्याचा खर्च मोठा व तो खर्च कुटुंबाला पेलवत नसल्याने इच्छा असूनही जेमतेम बारावीपर्यंतचे शिक्षण घ्यावे लागले.
बारावीच्या पुढे इच्छा असूनही आजारपणामुळे तिला पुढे शिकता आले नाही मात्र मांडवे येथील आ. राम सातपुते यांचे सहकारी नंदू लवटे यांनी ही गोष्ट आ. राम सातपुते यांच्या कानावर घातली आणि आ. राम सातपुते यांनी पुनम वाघमोडे ला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करून आठ लाख रुपयांचे ऑपरेशन मोफत करून दिल्याने वाघमोडे कुटुंबीयांनी आ. राम सातपुते यांच्या बद्दल आदरभाव व्यक्त करीत आहे
माळशिरस तालुक्यासह संपूर्ण राज्यभरातील गोरगरीब कुटुंबातील रुग्णांना पुणे मुंबई सारख्या मोठ मोठ्या शहरांमध्ये मोफत ऑपरेशन करून देणारे आ राम सातपुते हे सर्वदूर परिचित आहेत यातच गिरवी ता. माळशिरस येथील पुनम वाघमोडे हिच्या आजारपणाची माहिती नंदू लवटे यांनी आ. राम सातपुते यांना दिल्यानंतर लागलीच आ. राम सातपुते यांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये पुनम वाघमोडेला उपचार करीता दाखल केले.
तिच्या दोन्ही खुब्याचे बॉल निकामे असल्याने दोन्ही खुब्यांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर ९ जून २०२२ ला पहिली शस्त्रक्रिया करण्यात आली ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर २७ जून २०२२ रोजी दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली व या दोन्ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या शस्त्रक्रिया झाल्यानंतर लागलीच आ. राम सातपुते यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पुनम वाघमोडे च्या तब्येतीची विचारपूस केली व कुटुंबाला धीर दिल्याने वाघमोडे कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेना आ. राम सातपुते यांच्या प्रति या कुटुंबीयांनी कृतज्ञता तर व्यक्त केलीच परंतु माणसातला देव माणूस म्हणून राम सातपुते यांना संबोधले आहे .
या अगोदरही राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्यातील अनेक रुग्णांवर लाखो रुपयांचे मोफत उपचार पुणे मुंबई सारख्या मोठं मोठ्या शहरांमधील नामांकित हॉस्पिटलमध्ये करून दिले आहेत. सातपुते यांच्या या सहकार्याने माळशिरस तालुक्यातील अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे. यामुळे त्यांच्या या आगळ्यावेगळ्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे .
पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुनम वाघमोडे या मुलीवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आ. राम सातपुते यांनी त्या ठिकाणी जाऊन पुनम वाघमोडे च्या तब्येतीची विचारपूस केली.
Comments
Post a Comment