#Pune:गुरुपूजनाने खुलले वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे प्रांगण
महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
गुरुविण कोण दाखवील वाट
आयुष्याचा पथ हा दुर्गम
अवघड डोंगर घाट
असा हा पथ सुगम करणाऱ्या गुरुंसाठी वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेमध्ये गुरु पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व वनाझ परिवार विद्यामंदिर यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंत्रमुग्ध वातावरणात मंत्रोच्चार,गुरुस्तवन व गुरुपूजन झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यकर्त्यांचे कार्यक्रमास लाभलेल्या उत्स्फूर्त सहभागाबद्दल आभार.
यावेळी त्यांच्याकडून विद्यार्थी व शिक्षकांना पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
आजच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्या संध्याताईनी स्वामी विवेकानंदांविषयी मंत्रमुग्ध करणारी गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली.आजच्या दिवशी विवेकानंदांसम शिष्य व्हावे अशी आशा व्यक्त केली.तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशपांडे सर व पाटील सर यांनी गुरुस्तवन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुनीताताई जपे प्रास्ताविक सौ. मायाताई झावरे व आभार प्रदर्शन सौ. संगीता ताई चव्हाण यांनी केले शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनिताताई दारवटकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाने शाळेत प्रत्येक कार्यक्रम उत्साहाने व उत्सवासमान पार पाडले जातात. अशाप्रकारे बुधवार १३ जुलै रोजी गुरु पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमेचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
Comments
Post a Comment