Hot Posts

6/recent/ticker-posts

#Baramati: बचत गटाच्या माध्यमातून महिलांची यशस्वी उद्योजक होण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू


महादरबार न्यूज नेटवर्क - पल्लवी चांदगुडे
इंदापूर तालुक्यातील बोरी या गावातील कित्येक महिला ज्यांनी बचत गट चालू करून एक यशस्वी उद्योजकाच्या दृष्टीने वाटचाल चालू असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे .

स्त्री शक्ती महिला स्वयंसहाय्यता समूह आणि भिमाई महिला स्वयंसहायता समूह या बचत गटातील महिलांनी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान पुणे यांच्या मार्गदर्शनाने बँक ऑफ महाराष्ट्र पुरस्कृत ग्रामीण महिला व बालविकास  मंडळ या संस्थेद्वारे प्रशिक्षण देण्यात आले.       

ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे नीलम जाधव , राम कांबळे यांच्या मार्गदर्शनाने समूहातील महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राख्या बनवल्या आहेत.

महिलांनी इंदापूर तालुक्यातील लासुरने ,भवानीनगर येथे स्टॉल लावून राख्यांची विक्री केली आहे. बचत गटातून घेतलेल्या पैशातून राख्या बनवून विक्री केल्यामुळे त्यांना त्याचा दुप्पट मोबदला मिळालेला आहे.

Post a Comment

0 Comments