महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची संधी मिळणे हे आयुष्यातील सर्वात मोठी भाग्याची बाब आहे. असे मत मराठी पत्रकार परिषद प्रतिनिधी आणि जेष्ठ पत्रकार शेलार यांनी बोरीऐ नंदी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
ग्रामपंचायत बोरीऐ नंदी यांचे वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोसातवा निमित्त विविध कार्यक्रम आणि विशेष उपक्रम अंतर्गत येथें रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी रक्तदान शिबाराचे उदघाटन आणि प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले, रोप्य महोस्टव आठवत नाही,परन्तु अमृत महोत्सव कार्यक्रमास एक अधिकारी म्हणून गावोगावच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली हा जीवनातील सर्वोच आनंद आहे. सरपंच आणि त्याचे सर्व सहकारी यांनी सर्वांना सहभागी करून घेऊन आपलया गावचा सर्वांगीण विकास करावा, यासाठी आम्ही सहकार्य करण्यास सदैव तत्पर आहे,
शेलार पुढे म्हणाले, १९७२ साली २५ वा रजत महोत्सव विद्यार्थी म्हणून सहभागी होतो, १९९७साली ५०वा सुवर्ण महोत्सव साजरा होताना पत्रकार म्हणून सहभागी होतो आणि २०२२या वर्षी अमृत महोत्सव साजरा होतांना मान्यवर म्हणून संधी मिळते या पेक्षा भाग्य ते कोणते
आमचे सरपंच आणि सहकारी तरुण आहेत विकास कामात बीडीओ साहेबांनी झुकते माप द्यावे.
यावेळी सरपंच जीवन पवार, उपसरपंच शुभांगी गायकवाड, माजी सरपंच व विद्यमान सदस्य गणेश दौंडकर, माजी सरपंच बाळासाहेब गायकवाड, निलेश पाटील, प्रताप तावरे, ग्रामसेवक पी.के, जाधव, आरोग्य कर्मचारी ,ग्रामस्थ रक्तदान शिबिर घेणारे डॉक्टर त्यांचे सहकारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य सेविका ,डॉक्टर यांचाही सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत यांच्यावतीने अमृत महोस्टव निमित्त आरोग्य शिबीर, वृक्ष लागवड, कोविड काळात विशेष कामगिरी केलेल्या आशा सेविका, परिचारिका, कार्यकर्ते यांचा सन्मान, विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थांचा सत्कार, माजी सैनिक, डॉक्टर, विशेष पदावरील व्यक्ती, लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण, समाजात विशेष कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब गायकवाड तर सूत्रसंचालन तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी केले,
0 Comments