#Chiplun:संगमेश्वर तालुक्यातील जाधव कुटुंबीयांना आ. शेखर निकम यांचा मदतीचा हात

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
संगमेश्वर तालुक्यातील पाचांबे गावातील संजय महीपत जाधव यांचे गोठ्यावर वीजपडून १३ गुरे व वैरण जळून खाक झाली होती.त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाथ होता.त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे मदतीचा हात मागितला होता.त्यानुसार बँकेचे संचालक व आमदार शेखर निकम सर व स्थानिक संचालक राजेंद्र सुर्वे व नेहा माने यांनी संचालक मंडळ बैठकीत यावर चर्चा करून त्यांना मदत द्यावी अशी आग्रही मागणी केली. त्यावर संचालक मंडळाने तातडीची मदत मंजूर केली.आणि त्यांना मदतीचा हा एक लाखाचा धनादेश सोमवारी वितरित करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी भरत चोगले,राष्ट्रवादी देवरुखचे शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर,कृषी बाजार उत्पन्न समितीचे माजी सभापती दत्तात्रय उर्फ बाळू ढवळे,देवरुख सोसायटीचे चेअरमन संतोष लाड, नगरसेवक प्रफुल्ल भुवड,सहायक निबंधक सतोषकुमार पाटील,विनोद म्हस्के,बँकेचे तालुका निरीक्षक तुषार साळुंखे,व्यवस्थापक बँकेचे संतोष जाधव,शाखा व्यवस्थापक रविकांत शिंदे,पंकज पुसाळकर,पाचांबे सरपंच संदेश घाडगे,नारायण भुरवणे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत