#Solapur:गणेशोत्सव मंडळ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यास 2 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ


सोलापूर,दि.30 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार सांस्कृतिक कार्य विभागाने यावर्षी गणेशोत्सवासाठी उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दत निश्चित केली आहे.गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30 ऑगस्ट 2022 दिली होती, स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी अर्ज भरण्याची मुदत 2 सप्टेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक शासनाने जाहीर केले आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या

ईमेलवर 2 सप्टेंबर 2022 पूर्वी ऑनलाईन पाठवावेत. प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी मुंबई यांनी सदर अर्जाची जिल्हानिहाय विभागणी करुन संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यांच्या ईमेलवर दि. 3 सप्टेंबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत अर्ज उपलब्ध करुन द्यावेत. यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी स्वतंत्र ईमेल तयार करुन प्रकल्प संचालक, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांना त्यांच्या
pldeshpande१११@gmail.com ईमेल वर कळवावे, असेही शुद्धीपत्रकात म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत