महादरबार न्यूज नेटवर्क -
भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त नातेपुते येथे नातेपुते भजनी मंडळ नातेपुते महिला भजनी मंडळ, नातेपुते पत्रकार बंधू, अखंड हरिनाम सप्ताह समिती नातेपुते,यांच्या वतीने मोठ्या उत्साहात दिनांक १४ ऑगस्ट सकाळी साडे नऊ वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली.
तिरंगा रॅलीला खंडोबा मंदिर नातेपुते येथून सुरुवात होऊन नातेपुते येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे, उमाजी नाईक या महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, पिराळे चौकातून नगरपंचायत मार्गे शंभू महादेव मंदिर या ठिकाणी या तिरंगा रॅलीची सांगता झाली.
या तिरंगा रॅलीमध्ये जेष्ठ किर्तनकार ह भ प मनोहर महाराज भगत नातेपुते गावचे माजी सरपंच व नगरसेवक अॅड बी वाय राऊत, विजय दादा उराडे, भाजपाचे प्रविण काळे, बिट्टू अण्णा काळे, आर पी आयचे नेते एन के साळवे, संजय मामा उराडे, विजय डफळ, शशिकांत पलंगे, राष्ट्रवादीचे अक्षय भांड, भजनी मंडळाचे साहेबराव देशमुख ,भागवत चांगण, नारायण चांगण, दशरथ चांगण, दयानंद लाळगे , अनिल गरगडे, एकनाथ उराडे, दिंगबर लाळगे, संजय कुचेकर, श्रीमंत महाराज माने, श्रीकृष्ण महाराज भगत, गणेश महाराज भगत, लक्ष्मण महाराज पिंगळे, रमेश महाराज लांडगे, संभाजी लांडगे, दशरथ पवार, चंद्रकांत कवितके, सुदाम एकळ, माऊली कवितके, नातेपुते गावचे पत्रकार बंधू श्रीकांत बापू बाविस्कर, सुनिल दादा राऊत, उमेश पोतदार ,समिर सोरटे, विलासराव भोसले, अभिमन्यू आठवले, अदिनाथ महाराज भगत, बालकिर्तनकार नातेपुते, समर्थ एकळ, सोहम लांडगे तसेच गावातील महिला भजनी मंडळ व दत्त प्रसादिक भजनी मंडळ तसेच सर्व पत्रकार बंधू ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच चंद्रकांत तात्या ठोंबरे विनायकराव उराडे तुकारामभाऊ ठोंबरे, श्रीकांत बाविस्कर, श्रीराम भगत महाराज यांनी परिश्रम घेतले.
0 Comments