#Baramati:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बारामती शहर पोलीस ठाणे तर्फे मॅरेथॉनचे आयोजन
महादरबार न्यूज नेटवर्क - पल्लवी चांदगुडे
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने लोकांमध्ये आरोग्य विषयी स्वतः प्रति जागृती निर्माण व्हावी म्हणून १० किलोमीटर मॅरेथॉन आयोजित करण्यात आले होते.
मॅरेथॉन मध्ये लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. महिलांनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विशेष करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला.
सर्व सहभागी मान्यवरांना प्रमाणपत्र देण्यात आले बारामती शहर पोलीस ठाण्याकडे नेमणुकीस असलेले अधिकारी कर्मचारी तसेच दंगल काम्बू पथक यातील कर्मचारी व विविध पोलीस अकॅडमी विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभाग घेतला.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये अनेक पत्रकार बंधू प्रमुख सत्र न्यायाधीश श्रीमती जेपी दरेकर मॅडम प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी व अंतर किरे साहेब या सर्वांनी बारामती शहरातील मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला.
मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अविनाश देशमुख, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशान्वये बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक व त्यांच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी बंदोबस्त व कामाची व्यवस्था असताना सुद्धा थोड्या कालावधीत मॅरेथॉनचे आयोजन केले.
Comments
Post a Comment