नातेपुते नगरपंचायतीच्या विरोधातील निवेदन पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास (2) विभाग यांना पाठवल्याचा सचिन रणदिवे यांना ई-मेल प्राप्त
महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते नगरपंचायतीचे संबंधित अधिकारी यांनी निवडणूक खर्चात मोठ्या प्रमाणात अपहार (भ्रष्टाचार) केला असून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रा.डॉ मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना ईमेलद्वारे निवेदनाची माहीतीसाठी प्रत पाठवण्यात आली होती.
त्यामध्ये असे नमूद करण्यात आले होते की नातेपुते नगरपंचायतीची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली यामध्ये नातेपुते नगरपंचायत नातेपुते सार्वत्रिक निवडणूक 2021 चा खर्चाचा तपशिलात मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत आहेत निवडणूक कर्मचारी भत्ता, वाहन,जेवण, नाश्ता, मंडप,डिजिटल फोटो स्टुडिओ, व्हिडिओ शूटिंग, महसूल कर्मचारी भत्ता व इतर यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात अपहार (भ्रष्टाचार) झाल्याचे दिसून येत आहे तसेच टेंडर प्रक्रियेत त्रुटी आढळून येत आहेत तरी आपण संपूर्ण निवडणूक कार्यकाळातील झालेला एकूण खर्च 2238059/- या खर्चाची संपूर्ण दप्तर चौकशी करण्यात यावी कारण नातेपुते नगरपंचायत संबंधित अधिकारी यांचा अनागोंदी कारभार सुरू असून त्या ठिकाणी आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी अवस्था झालेली आहे तरी आपण आपल्या स्तरावरून नातेपुते नगरपंचायतीची संपूर्ण निवडणुक काळातील दप्तर चौकशी तात्काळ करून संबंधित अधिकारी यांच्यावर ती योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा दलित महासंघाच्या वतीने सोलापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांना दिले होते
त्या निवेदनाची माहितीसाठी प्रत माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांना दिली होती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या कार्यालयाने निवेदनाची दखल घेत निवेदन पुढील कार्यवाहीसाठी नगर विकास (2) विभाग यांना पाठवण्यात आले असल्याचा ई-मेल नोंदणी शाखा मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडून दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांना प्राप्त झाला आहे. सचिन रणदिवे यांनी निवेदनाची दखल घेतली म्हणून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे व त्यांच्या कार्यालयाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
0 Comments