महादरबार न्यूज नेटवर्क - अक्षता हनमगर
दौंड तालुक्यातील खामगाव येथील गाडामोडी - पिंपळगाव रस्तावरील तांबेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेसमोर वारंवार पाण्याचे तळे साठत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्यातून ये-जा करताना परिसरातील विद्यार्थ्यांबरोबरच नागरिक, , दुचाकी, चारचाकी वाहनांना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे नागरिकांना पायी चालणेही अवघड झाले आहे.
पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होत नसल्याने प्रशासनाच्या कारभारावर परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त करत आहे. यवत स्टेशन, उंडवडी,लडकतवाडी येथील अनेक विद्यार्थी या रस्त्यावरून पाण्यातुन कसरत करत शाळेत जात आहेत तर जवळच जि.प शाळा असल्याने साठवेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते, या पाण्यातूनच विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागत आहे. जवळून मोठे वाहन गेल्यास मुलांच्या अंगावर घाण पाणी उडत आहे, प्रशासनाने लवकरात लवकर ही समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
0 Comments