अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सायकलीसह सहभागी होण्याचे आवाहन
महादरबार न्यूज नेटवर्क -
"भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव" अंतर्गत ९ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये राज्यात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत विविध उपक्रम/कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.
त्याअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस अधिक्षक ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. ९ ऑगस्ट) सकाळी ७.०० वाजता जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली. जनजागृती रॅली आसरा चौक, जुळे सोलापूर येथून विमानतळ मार्गे होटगी ता. दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत कार्यालय अशी जाणार आहे.
या जनजागृती सायकल रॅलीस जिल्हाधिकारी तसेच सर्व शासकीय कार्यालयातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी स्वतःची सायकल घेऊन, पांढरा पेहराव, हाताला व सायकलला तिरंगा रिबन बॅन्ड, तिरंगी फुगे याची सजावट करुन आसरा चौक, जुळे सोलापूर येथे उपस्थित राहणेबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्देश दिलेले आहेत.
0 Comments