Hot Posts

6/recent/ticker-posts

#Chiplun:चिपळूण-एस. टी. महामंडळातील संप काळातील भरती केलेल्या वाहन चालकांनी वेतनाबाबत आ. शेखर निकम यांना दिले निवेदन

महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव 
चिपळूण एस.टी महामंडळातील मध्यंतरी संप काळात एस. टी. महामंडळात चालक नियुक्ती करण्यात आली होती व सध्या हे वाहन चालक या पदांवर कार्यरत आहेत. एस. टी. महामंडळाची  दि. ९ फेब्रुवारी २०२२ चे पत्र क्र. राप/वाहन चालक/३०४  नुसार अस्तित्व मल्टीपर्पज सर्व्हिसेस (ओपीसी) प्रा. लि. अस्तित्व टॉवर, मनोहर गार्डन, गेट नं. ३, जय भवानी रोड, नाशिक रोड या कंपनीच्या या पत्रात वाहन चालकास २३,९००/- (वस्तू व सेवा कर लागू) होणारे इतर शासकिय कर वगळून) इतके वेतन द्यायचे असे लिखीत स्वरुपात आहे अस चालकांचे म्हणने आहे. मात्र सदर कंपनी यांना दरमहा १४,०००/- (चौदा हजार रु मात्र) इतकेच वेतन देतात व काही वेळा यापेक्षाही कमी वेतन देतात व सदर कंपनी महामंडळाचे नियमांचे पालन करित नाही याबाबत निवेदन आमदार शेखर निकम सर यांना दिले आहे. 

याबाबत आमदार शेखर निकम सर यांनी एस. टी. वाहन चालकांशी  संवाद साधून राज्याचे मुख्यमंत्री, उप-मुख्यमंत्री, विरोधी  पक्ष नेते, परिवहन  सचिव, विभाग नियंत्रक यांना पत्र देऊन याचा पाठपुरावा करुन हा प्रश्न सोडवण्याबाबत अश्वासन दिले.

यावेळी  मंगेश कांबळी, दिपक गुडेकर, अनिल गोरीवले, रविंद्र महाडीक, अरुण  मोहिते, योगेश पडवेकर, सुरज हळदे, सुभाष गायकर, सचिन मोहिते, सचिन घाग, राजेश मोहिते हे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments