महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, नाबार्ड व यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भोसलेवाडी, उंडवडी या ठिकाणी आर्थिक डिजिटल साक्षरता मेळावा पार पडला. यामध्ये समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचे, महिलेचे घरगुती आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी बँकेने बचत खाते नाममात्र रकमेत गावातच उघडले या खात्याबरोबरच दोन लाखाचा अपघाती विमा ही देण्यात आला आहे. या मेळाव्याला गावातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद देत मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेतला.
यावेळी बोलताना बँकेचे दौंड तालुका विभागीय अधिकारी निलेश थोरात यांनी नागरिकांना बँकेच्या कामकाजाबद्दल सविस्तररीत्या माहिती दिली त्याचबरोबर
पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामुख्याने शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी अल्प दराने कर्जपुरवठा करणे व संलग्न सभासद संस्थेचे हित जोपासणे हा बँकेचा मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील महिलांचे आर्थिक सबलीकरण करण्याच्या हेतूने बँकेमार्फत त्यांना अल्प दराने कर्जपुरवठा करण्यात येतो मुख्य कचेरी पातळीवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला विकास कक्ष स्थापन केलेला आहे त्यानुसार स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना सवलतीच्या दराने किमान रुपये दहा लाखापर्यंत कर्जपुरवठा केला जात आहे त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिक व लघु उद्योगांना त्यांच्या निवडीनुसार भांडवली कर्जपुरवठा केला जातो बँकेच्या २९० शाखा व चार एक्सटेन्शन काउंटर त्याचप्रमाणे १११एटीएम सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे असे सांगितले.
यावेळी बँकेचे वरिष्ठ अधिकारी संजय गरदडे, निखिल कांबळे, योगेश फुले, यवत शाखाधिकारी शिंदे, लोणकर, संदेश पांढरे, रवींद्र फुले, स्वप्निल नातू, महेश चौधरी, प्रतीक थोरात वैभव नागवडे, अजय तोडकर सोसायटी सहाय्यक सचिव, भारत राऊत, ग्रा. सदस्य चिंतामण लोहकरे, सतीश लोहकरे, गणपत नवसकर, अमोल भोसले, सुरेश बामगुडे, ऋतुराज गुंड, पांडुरंग भोसले आदी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 Comments