महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
चिपळूण तालुका व शहर आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद निवडणूका लक्षात घेता सावर्डे फार्मासी,डिग्री कॉलेज येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक रविवार दि. ७ आॅगस्ट २०२२.राेजी पार पडली.
या वेळी आमदार शेखर निकम सर यांनी आपल्या भाषणात म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पक्षप्रमुख मा.शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ह्या तालुक्यामध्ये पक्ष संघटना वाढवणे हा उद्देश आहे.येणारी स्थानिक स्वराज्य संस्था व नगर परिषद निवडणुकीमध्ये आघाडी होऊ अथवा न होऊ मात्र स्वतंत्र लढण्याची इच्छा ठेवू जास्तीत जास्त यश संपादन करू तसेच पंचायत समिती आणि नगर पालिकेमध्ये आपल्या पक्षाचा सभापती व नगराध्यक्ष बसतील असे काम करू लोकसभा निवडणुकीमध्ये आपण ५७ हजार मतांनी मागे होतो तरीसुद्धा न डगमगता विधानसभा निवडणुकीमध्ये आपण विजय खेचून आणला आघाडीसाठी तालुकाध्यक्षांनी मित्र पक्ष्यांशी बोलणी करून घ्यावी महा विकास आघाडीचे सरकार असताना तालुक्या मध्ये अनेक विकास कामे करण्यात आली त्यामध्ये मतदार संघातील जनता समाधानी असून प्रलंबित विकासकामे पूर्ण करणार त्याचप्रमाणे विकास कामे केली म्हणून विजय मिळतो असे नाही संपर्क करून जास्तीत जास्त जनसंपर्क ठेवून बदल करणे गरजेचे आहे असे आमदार शेखर निकम सर म्हणाले.
बैठकीत तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, यांनी मार्गदर्शन करताना आमदार शेखर निकम सर माजी आमदार रमेश भाई कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुकांमध्ये चांगले यश संपादन करून राष्ट्रवादीचा झेंडा राष्ट्रवादीचा पंचायत समिती सभापती व नगराध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचा असेल, माजी पंचायत समिती सदस्य नितीन ठसाले म्हणाले की आमदार शेखर निकम सर मतदारसंघाचा अतिशय जोमाने विकास करत असून पक्ष संघटनेतील पदाधिकारी मात्र काम करत नाहीत असे मला निदर्शनात येते,चिपळूण तालुक्यातील ,गुहागर मतदार संघात जी गावे येतात या गावाच्या विकासाकडे लक्ष देणे आहे असे योगेश शिर्के व सुरेश खापले म्हणाले,
महिला जिल्हाध्यक्ष चित्रा ताई चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना म्हणल्या की आदरणीय पवार साहेब व अजित दादा यांचा आदर्श घेऊन पक्ष संघटना वाढि चे काम करावे माजी सभापती शौकत भाई मुकादम यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की माजी खासदार स्व.गोविंदराव जि निकम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना त्या काळामध्ये ज्या प्रकारे आम्ही आक्रमक काम केले त्याच प्रकारचे काम सध्याच्या युवकांनी करणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे महिलांनी पुढे येऊन पक्ष संघटना वाढीचे काम करणे गरजेचे आहे कारण महिला अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार देखील करू शकतात.
सदर बैठकीला मिलिंद कापडी, जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की युवकांना सुद्धा संधी मिळावी त्याचप्रमाणे दशरथ दाभोळकर, प्रकाश कानसे, रोहित गमरे, समीर पवार, प्रणिता घाडगे यांनी आपली मते प्रकट केली सदर,यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास सुर्वे यांचा अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला.
बैठकीला आमदार शेखर निकम सर तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, शौकत मुकादम, दादा साळवी,सुजय(अण्णा) रेडीज, अजमल पटेल ,चित्राताई चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, अशोकभाई कदम, डॉ. राकेश चाळके, मुराद अडरेकर,पांडुशेठ माळी, सुरेश खापले, मिलिंद कापडी, रमेश राणे,अबू ठसाळे, पूजा ताई निकम, रिया कांबळी, डॉ. रहिमत जबले, बाबू साळवी,समीर काझी, सूर्यकांत घेतले, राजाभाऊ चळके, जागृती शिंदे, दीपिका कोतवडेकर, शिवानी पवार, वर्षा जागुष्टे, जेके शिंदे, नंदू शिर्के, मयूर खेतले,जयंत शिंदे ,अनिल चिले, विकास गमरे,मंगेश माटे ,वैभव चव्हाण ,उदय ओतारी ,जमीर मुल्लाजी,इम्रान काेडकरी, सचिन साडविलकर,अशफाक तांबे,खालिद पटाईत, कादिर परकार, जागृती शिंदे,जानवी फाेडकर,मोबीन पाटवकर, दिनेश शिंदे, स्वप्नील शिंदे, विकास गमरे, सिद्धेश लाड, मनोज जाधव,संदीप जागुष्टे, अनिकेत ओतारी ,आल्हाद यादव ,वरूण गुढेकर,योगेश पवार, सुधीर भोसले, विकास पवार, शौकत माखजनकर, शांताराम बागवे,सचिन शिंदे, निलेश कदम, राहुल शिंदे, वात्सल्य शिंदे,आमिर कुटरेकर सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments