#Akluj:पद्मजादेवी मोहिते-पाटील यांची सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट पदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील प्रतिष्ठान धवलनगर अकलूज या संस्थेचे चेअर पर्सन मा. पद्मजादेवी (आईसाहेब) प्रतापसिंह मोहिते-पाटील यांची नुकत्याच पार पडलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या सिनेट मंडळाच्या निवडणुकीत सिनेट सदस्यपदी संस्थापक कोट्यातून बिनविरोध निवड झाली.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते येथील प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर यांची प्राचार्य प्रतीनिधी म्हणून सिनेट मंडळावर सदस्यपदी प्राचार्य कोट्यामधून बिनविरोध निवड झाली तसेच महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब निकम यांची विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर (B.O.S.) सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. संस्थेस तिहेरी यश संपादन झाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
सत्कार समारंभावेळी बोलताना मा. पद्मजादेवी म्हणाल्या की, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी केलेल्या तत्कालीन कामांचा व कमावलेल्या लोकांचा सदर निवडणुकीत खूप फायदा झाला व त्यांची पुण्याई सदैव आमच्या पाठीशी राहणार आहे. सदर कार्यक्रम प्रतापगड, अकलूज या ठिकाणी पार पडला व नातेपुते महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्रकुमार साठे, प्रा. हसन मोगल, प्रा. सौ. रब्बना मोगल, प्रा. श्रीमती. पुष्पा सस्ते, प्रा. सौ. निर्मला बनसोडे व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. डॉ. बाळासाहेब निकम यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. श्रीमती पुष्पा सस्ते यांनी आभार मानले.
खूप सुंदर बातमी
ReplyDelete