#Indapur:शासकीय योजनेतील अनेक प्रकारे मिळणारे लाभ समाजाला मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न राहील - दौलतनाना शितोळे



महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार 
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या हस्ते जय मल्हार क्रांती संघटना शाखेचे उद्घाटन संपन्न झाले.
पिंपरी बुद्रुक येथील उद्योजक व संघटनेचे मार्गदर्शक कल्याण भागवत भंडलकर यांच्या मार्गदर्शना खाली तसेच बावडा पोलीस स्टेशनचे सर्वच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन झाले. पिंपरी , गिरवी, गोंदी, टणु , लिंबोडी , या सर्व ठिकाणी या संघटनेचे उद्घाटन यावेळी महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे, उपाध्यक्ष अंकुशराव जाधव, महादेव जाधव, बापूराव जाधव, उत्तम जाधव, रोहित चव्हाण, या सर्वांच्या उपस्थित करण्यात आले. 

पिंपरी बुद्रुक येथील संघटनेचे मार्गदर्शक कल्याण बंडलकर सहित  सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी व गावातील  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जय मल्हार क्रांती संघटनेच्या उद्घाटन प्रसंगी दौलत नाना शितोळे बोलत आसताना म्हणाले की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील संघटना समाजासाठी काम करीत आहे. संघटनेसाठी येथून पुढील सुवर्ण आसा चांगलाच काळ असेल. सर्वच समाजाने एकत्रित येणे ही काळाची गरज आहे. जय मल्हार क्रांती संघटना  गोर गरिबांच्या सेवेसाठी सतत प्रयत्नशील राहून संघटनेच्या माध्यमातून समाजाला शासकीय योजनेतील आनेक प्रकारे लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. 

पिंपरी बुद्रुक येथील जय मल्हार क्रांती संघटनेच्या अध्यक्षपदी, देविदास भंडलकर तर उपाध्यक्षपदी हनुमंत भंडलकर, कार्याध्यक्ष विठ्ठल भंडलकर, सचिव दादासाहेब भंडलकर, सहसचिव नामदेव भंडलकर, खजिनदार पप्पू जाधव, सह खजिनदार संतोष भंडलकर, मुख्य संघटक बाजी भंडलकर, संघटक सोमनाथ भंडलकर, प्रवक्ता दादा भंडलकर, प्रसिद्धी प्रमुख गणेश भंडलकर, संपर्कप्रमुख मल्हारी जाधव, सहसंपर्क प्रमुख आदित्य भंडलकर, राम भंडलकर, या सर्वच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.  संघटनेच्या उद्घाटना प्रसंगी पिंपरी बुद्रुक येथील सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारी आणि ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम