#Baramati:शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल तरच होणार नीरा डावा कालव्याचे अस्तरीकरण - अजित पवार
डोर्लेवाडी गावात रखडलेला रस्ता हा दहा मीटरचाच होणार.. अजित पवार ( विरोधी पक्षनेते )
महादरबार न्यूज नेटवर्क - नवनाथ बोरकर
निरा डावा कालव्यामध्ये ज्या ठिकाणी गरज आहे आणि शेतकऱ्यांची मागणी असेल त्याच ठिकाणी कालव्याचे अस्तरीकरण होणार असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केले. बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे कृष्णाली ऍग्रो उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते.
यावेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, छ. कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माझी जि. प. अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बाजार समितीचे संचालक राजेंद्र बोरकर, बा. खरेदी विक्री संघाचे संचालक ज्ञानदेव नाळे, बारामती पंचायत समिती चे माझी सभापती प्रतिभा नेवसे, डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कालगांवकर, बापूराव गवळी, अविनाश काळकुटे, माझी उपसरपंच कांतीलाल नाळे, यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य आणि पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की बारामती आणि परिसरामध्ये विकास कामे ही मोठ्या प्रमाणात सुरू आहेत मात्र विरोधकांना विरोध करण्यासाठी कुठलाही मुद्दा नसल्याने या अस्तरी करणाला विरोध केला जात आहे. मात्र भाजप सरकारच्या काळातच बंद पाईपलाईन मधून पाणी आणण्याचे आयोजन होते. या निरा डावा ज्या ठिकाणी मुरमाड जमीन आहे त्या ठिकाणी पाण्याचा झिरपून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जास्त आहे. त्या ठिकाणी अस्तरीकरण करणे गरजेचे आहे कालव्याचे अस्तरीकरण होणार आहे मात्र ज्या ठिकाणी गरज आहे आणि शेतकऱ्यांची मागणी असेल त्याच ठिकाणी अस्तरीकरण होणार असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी स्पष्ट केले विरोधक मात्र यामध्ये स्पष्टपणे शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असेही पवार यांनी नमूद केले त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अजित पवार शेतकऱ्यांना केले आहे.
डोर्लेवाडी गावात रस्ता रुंदीकरनाला काहीजण जाणीवपूर्वक विरोध करीत रस्ता करून देत नाहीत असे डोर्लेवाडीचे सरपंच बाळासाहेब सलवदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी उठून काही जणांनी हा रस्ता 7 मीटरचाच करावा अशी अट घातली मात्र डोर्लेवाडी येथील रस्ता हा अंदाजपत्रका मध्ये दहा मीटरचाच आहे. बिकेबिएन रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे मात्र हे काम गेली दीड वर्षापासून डोर्लेवाडी गावात रखडले आहे. यामुळे काहींच्या आडमुठेपणामुळे नागरिकांना, वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे येथील ग्रामस्थांची मागणी अशी आहे की गावातील रस्ता हा दहा मीटरचा व्हावा त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले की गावात रस्ता हा दहा मीटरचा होणार असून अधिकाऱ्यांशी चर्चा करून हा रस्ता पूर्ण होईल असे आश्वासन अजित पवार यांनी ग्रामस्थांना दिले. यात येथील नागरिकांनी या रस्त्यांचे काम करीत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरला सहकार्य करावे असे आव्हान अजित पवार यांनी केले आहे.
Comments
Post a Comment