Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:नागरिकांनी जागृत रहावे यासाठी पत्रकार व व्यापारी यांची नातेपुते पोलिस स्टेशन येथे बैठक संपन्न


महादरबार न्यूज नेटवर्क -
नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये नूतन पोलिस अधिकारी सपोनि प्रवीण संपांगे यांनी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये लहान मोठ्या चोऱ्या  वादविवाद यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व जनतेमध्ये जागृती व्हावी या साठी नातेपुते पोलीस स्टेशनच्या आवारात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत चोरी, वाद-विवाद इत्यादि विषयावर चर्चा संपन्न झाली.
 

बैठकीमध्ये नूतन सपोनि प्रवीण संपांगे म्हणाले की, आम्ही जनतेचे सेवक आहोत व जनतेचे रक्षण करणे ती आमची जबाबदारी आहे ती पार पाडण्यास आम्ही कमी पडणार नाही तसेच नातेपुते सह परिसरातील छोटे मोठे व्यापाऱ्यांनी सतत दक्ष जागृत रहावे व्यवसाय करीत असताना जर त्या व्यवसाय धारकाने कमविलेला पैसा, सोने इत्यादी वस्तु चोरट्याने चोरून नेल्यास  व्यवसाय धारककाचे मोठे नुकसान होते तो व्यापारी अधोगतीकडे जातो व कमविलेले क्षणात होतेचे नव्हते होत तसेच नातेपुते पोलिस स्टेशनला कर्मचारी संख्या कमी असल्याने  त्या कर्मचाऱ्यावर  ताण पडत आहे तरीपण आम्ही जनतेला संरक्षण देण्याचा प्रयत्न करीतच आहोत असे असताना सर्वांनी आपआपल्यापरीने जागृत रहावे असे आवाहन संपांगे यांनी व्यापारी व जनतेला केले. 

यावेळी विविध दैनिक, साप्ताहिक चे पत्रकार तसेच व्यापारी व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन गोपनीय कक्षाचे गणेश कापसे यांनी केले

Post a Comment

0 Comments