#Malshiras:माळशिरस नगरपंचायतचा ७ वा वर्धापन मोठ्या दिमाखात साजरा

महादरबार न्यूज नेटवर्क -
सावता माळी मंदिराच्या परिसरात माळशिरस नगरपंचायत चा सातवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात घेण्यात आला .तालुक्यात स्थापन झालेल्या नगरपंचायती पैकी पहिली नगरपंचायत म्हणून माळशिरस नगरपंचायतीकडे पाहिले जाते.माळशिरस नगरपंचायत झाल्यापासून शहराचा अगदीच चेहरा मोहरा बदलला आहे .शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मूलभूत गरजा  रस्ते, पाणी ,विज, हे पुरवण्यासाठी नगरपंचायतीने नेहमीच पुढाकार घेतला आहे. माळशिरस शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपापसातले वाद न उकरता केवळ नगरपंचायत माळशिरस चा विकास हाच ध्यास असणं गरजेचं आहे व सर्वच राजकीय पार्ट्यांनी गाव विकासासाठी एकत्रित येणे ही या पुढच्या काळाची गरज आहे.असे मत माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये मांडलं. 
 
यावेळी विकासदादा धाईजे, पांडुरंग तात्या वाघमोडे ,मारुती देशमुख , अनिल सावंत, मुख्याधिकारी माधव खांडेकर, यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याधिकारी माधव खांडेकर,नूतन मुख्याधिकारी नितीन गाढवे तसेच माळशिरस ग्रामपंचायत असताना जे लोकांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न केला अशा सर्व माजी सरपंच -उपसरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य , माजी नगराध्यक्ष ,माजी उपनगराध्यक्ष,  माजी नगरसेवक   व प्रतिष्ठित व्यक्ती माळशिरस करांचा सन्मान करण्यात आला .यावेळी वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा  व रांगोळी स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनी व महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच  माळशिरस नगरपंचायतीच्या सर्व समावेशक ( पाणी,वीज ,रस्ता,स्वच्छता व हरियाली) अशा लोगोचे अनावरण देखील करण्यात आले. 

यावेळी रमाई आवास योजना घरकुल ६४ जणांना चावी वाटप करण्यात आली तसेच २२ दिव्यांग व्यक्तींपैकी ७जणांना प्रमाणपत्र व १५जणांना यु डी आय डी कार्ड वाटप करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष डॉ .आप्पासाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष शिवाजीराव देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर,नूतन मुख्याधिकारी नितीन गाढवे,माजी सरपंच तुकाराम देशमुख ,पांडुरंग(तात्या)वाघमोडे, माजी सरपंच विकास धाईजे, विष्णू केमकर,माजी नगरसेवक मारुती देशमुख,नगरसेविका ताई वावरे,अर्चना देशमुख, पुष्पवती कोळेकर, रेश्मा टेळे,मंगल केमकर, मंगल गेजगे,कोमल जानकर, पूनम वळकुंदे,राणी शिंदे,प्राजक्ता ओव्हाळ, शोभा धाइंजे, नगरसेवक विजय देशमुख, रघुनाथ चव्हाण,  कैलास वामन,आकाश सावंत,  आबा धाईजे , गौरव गांधी,  तसेच लतादेेवी सिद  ,रावसाहेेब देेशमुख ,संतोष वाघमोडे ,सुरेश (आबा) वाघमोडे ,महादेव कोळेकर , सचिन (आप्पा)वावरे ,अजिनाथ वळकुंदे,वैभव जानकर , यशवंत पवार  ,भगवान थोरात ,रंजना पिसे ,उद्धव जमदाडे ,मधुमती सोनवणे ,बबन देवकते ,राजाभाऊ देवकते  आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे  प्रस्ताविक  व आभार माळशिरस नगरपंचायतीच्या कार्यालयीन अधीक्षक भाग्यश्री बेडगे  यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम