#Malshiras:स्वस्त धान्याच्या प्रतिक्षेत असणारी वंचित,गरजु व गरीब कुटुंबे राष्ट्रीय अन्नसुरक्षा यादीत घ्यावी,आम आदमी पार्टीचे तहसिलदार यांना निवेदन
महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यात स्वस्त धान्याच्या प्रतिक्षेत असणारी हजारो वंचित,गरीब व गरजु कुटुंबे आहेत.त्यांना त्वरित "राष्ट्रीय अन्नसुरक्षा " यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करावी.अन्यथा माळशिरस तहसिल कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.
माळशिरस तालुक्यात जे सध्या "राष्ट्रीय अन्नसुरक्षा " अंतर्गत स्वस्त धान्य घेत आहेत.त्यापैकी अनेक कुटुंबे आताच्या सद्यपरिस्थितीत सधन झाली आहेत, ही सत्य परिस्थिती आहे.यासाठीच मा.जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी " स्वस्त धान्य हक्क सोडा " ही शोध मोहिम सुरु केली आहे.त्याच अनुषंगाने आपणास नम्र विनंती करण्यात येते कि, या शोध मोहिमेबरोबर जी वंचित,गरजु व गरीब कुटुंब स्वस्त धान्य प्रतिक्षेत आहेत.ज्यांना स्वस्त धान्यांची गरज आहे.अशी अनेक कुटुंबे माळशिरस तालुक्यात आहेत. जी अजूनही खुप हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना आज काम केले तरच संध्याकाळी जेवण मिळते अशीच परिस्थिती आहे.
लवकरात लवकर अश्या कुटुंबांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करण्यासाठी जास्त प्रयत्न करावे.जर आपल्या कार्यालयाकडून कोणतीच दखल घेण्यात येत नसेलतर शेवटी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा पुरवठा विभागाला देण्यात आला आहे असे आम आदमी पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष संदिप इंगोले,तालुका संघटक अँड.मनोजकुमार सुरवसे,तालुका कायदेतज्ञ अँड.नितिन भोसले,तालुका प्रवक्ते विनायक सावंत,इतर सहकारी उमेश राऊत व हनमंत सोरटे यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment