महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
दौंड तालुक्यातील यवत येथे दि ४रोजी तृतीयपंथी वाड्यात गौरी गणपतीच्या निमित्ताने पुणे जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा सौ कांचन कुल यांनी भेट दिली, यवत पंचक्रोशीत प्रख्यात असलेला तृतीयपंथी वाडात गुरुवर्य दीपा रंजीता नायक यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे गौरी गणपती महोत्सव साजरा करण्यात येतो.
या वेळी सुवासिनी भोजनाचा हलता देखावा करण्यात आला होता, यवत गावातील व पंचक्रोशीतील महिलांना तृतीयपंथी दीपा रंजीता नायक यांच्या कडुन सर्व महिलांना हळदी कुंकू समारंभाचे आमंत्रण देण्यात आले होते, गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त तृतीयपंथी वाड्यात येऊन हळदी कुंकवाचा मान देण्यात आला,व गौरी गणपतीच्या निमित्ताने सुवासिनी भोजनाचा हलता देखावा पाहुन सर्व महिला भारावून गेल्या होत्या, देखाव्यातील परपंचीक पारंपारिक वस्तूंची निर्मिती पूर्वजांनी केलेले संस्कार आजच्या नवीन पिढीला आठवण करून देणारा हा देखावा महिलांच्या आवडीचा विषय बनला होता, या प्रसंगी भाजप पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ कांचन कुल, यांनी मनोगत व्यक्त केले.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही नानी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खूप सुंदर देखावा सादर केला आहे, मी येथे आवर्जून दर्शनासाठी येत असते, येथील गौवराईंची आरस सजावट पाहून मन प्रसन्न होते, साक्षात गौराई दर्शन घडते,
या ठिकाणी दरवर्षी वेगवेगळ्या समाज प्रबोधनाच्या माध्यमातून देखावा सादर केला जात असल्याने, परिसरातील महिलांची गौरी प्रति उत्सुकता वाढत चालली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी तृतीयपंथी दीपा गुरु (नानी) यांनी कांचन कुल यांचा हळदी कुंकूवाचा मान व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तृतीयपंथी दीपा रंजीता नायक यांनी बोलताना सांगितले, गेली दोन वर्ष कोरोणा महामारी मुळे जगजीवन विस्कळी झाले होते, भगवंताच्या कृपेने आता सर्व ठिक झाले आहे मी गौरी गणपती कडे एवढीच प्रार्थना करते रोगराई पासून सर्व मानवांचे रक्षण कर, प्राणीमात्रावर आलेल्या संकटाला दूर कर,या वेळी तृतीयपंथी वाड्यातील पल्लवी गुरु दीपा, आचल गुरु दिव्या, गौरी गुरु दीपा, ममता गुरु आचल, आम्रपाली, अनेक नटेश्वर व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गौरी गणपतीच्या सणाला यवत पंचक्रोशीतील महिलांनी हळदी कुंकवाचा मान घेऊन तृतीयपंथींच्या वाड्यात सुवासिनी भोजनाचा देखावा पाहुन, गौरी गणपतीच्या प्रसादाचा अस्वाद घेतला, या कार्यक्रमासाठी मोलाची मेहनत, दीपा गुरु रंजिता नायक, पल्लवी गुरु दीपा, आचल गुरु दिव्या यांनी एक महिन्या पूर्वीपासून केली होती.
0 Comments