महादरबार न्यूज नेटवर्क -
करमाळा तालुक्यातील पाथुर्डी ग्रामपंचायतच्या निवडणूकित सौ. रुक्मिणी शितलकुमार मोटे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. पूर्वीच्या सरपंच आश्विनी मोटे यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. सरपंच पदाच्या निवडणुकीत सौ. रुक्मिणी शितलकुमार मोटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी के.एस.खारव यांनी घोषित केले. यावेळी माजी सरपंच अश्विनी मोटे, उपसरपंच प्रकाश खरात, ग्रामपंचायत सदस्य सुनंदा मोटे, आशा तोडेकर, सचिन चांगण, चांगदेव कानडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एस.एस.पाटील, ग्रामसेवक महेश काळे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण साने, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय जाधव, पोलीस कॉन्स्टेबल महेश बचुटे, पोलीस कॉन्स्टेबल मयूर कदम, होमगार्ड रोहिदास लोंढे गावातील आजी माझी पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील पाथर्डी हे 2700 लोकसंख्या असलेलं छोटस गाव पत्रकार शितलकुमार मोटे यांच्या झंजावाती पत्रकारितेमुळे तालुक्यात नावा रुपाला आल.. मोटे हे जवळपास तीस वर्ष बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात वडील नोकरीस असल्याने राहत होते.. त्याचे मुळगांव सोलापूर जिल्ह्यातील पाथर्डी आहे गावांत जाऊन राहायचे आणि गावाचे नांव उज्जवल करायचे असा चंग बांधला आणि गावात येऊन राहिला लागले
पत्रकारितेच्या माध्यमातून आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने गावांतील भांडण तंटे गावांतच सोडवणे, गावात समाज उपयोगी उपक्रम राबविणे असे अनेक चांगली कामे करून गावकऱ्यांच्या मनातील ताईत बनले.. मोटे यांनी गांवी ( पाथर्डी ) येऊन तरुणाच्या सहकार्याने आणि वयोवृद्दाच्या आशिर्वादाने आणि पत्रकारितेच्या जोरावर शितलकुमार मोटे यांनी गावांमध्ये नागरिकांच्या असलेल्या अनेक अडीअडचणी सोडवण्यासाठी वयोवृद्ध आणि युवकांना बरोबर घेत गावातील अनेक समस्या सोडवल्या.. यामुळेच गावातील सर्वांनी मिळून त्यांना गावच्या तंटामुक्त अध्यक्षपदी बिनविरोध निवड करून कामाची पावती देखील दिली.. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी झालेल्या पाथर्डी ग्रामपंचायत च्या सरपंच पदी त्यांच्या पत्नी सौ. रुक्मिणी मोटे यांची एकमताने बिनविरोध निवड करून मान दिला आहे.
गावातील वंचित घटकांबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून त्यांना सहकार्य करणे, शासकीय योजनांचा लाभ वंचित, निराधार, विधवा, परित्यक्तता, अपंग व्यक्तींना मिळवुन देणे असेल, शासनाकडून आलेल्या निधीचा योग्य पध्दतीने उपयोग करून पाथर्डी गांव सर्वांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या आणि जिल्ह्याच्या नकाशावर आणण्यासाठी गावाला पारितोषिक मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन गावातील नागरिकांनी देखील गावच्या विकासासाठी वाद विवाद, मतभेद बाजूला ठेवत सहकार्य करावे मला मिळालेल्या सरपंच पदाला साजेशे काम करून गावाने दिलेल्या संधीचे सोने करून दाखवेन असे नवनिर्वाचित सरपंच सौ रुक्मिणी शितलकुमार मोटे यांनी सांगितले आहे.
0 Comments