#Malshiras:कदमवाडीचे ग्रामसेवक यांची दप्तर चौकशी व विविध मागण्यांसाठी दलित महासंघाचे हलगीनाद आंदोलन
निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल गटविकास अधिकारी यांचे आंदोलन कर्त्यांना आश्वासन
महादरबार न्यूज नेटवर्क -
मौजे कदमवाडी येथील ग्रामसेवक यांच्या कार्यकाळातील संपूर्ण दप्तर चौकशी तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी व रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या मंजूर झालेल्या विहिरींची चौकशी यासाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ. मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस पंचायत समिती समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते बाबुराव खिलारे,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सपताळे, कदमवाडी उपसरपंच दत्तात्रय मजगे, प्रहार शेतकरी संघटना अध्यक्ष बाळासाहेब मगर, प्रहार संघटनेचे संजय पवळ, क्रांती गुरु लहुजी साळवे विकास परिषद तालुका अध्यक्ष आबा भिसे, दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष पप्पू जगन्नाथ मिसाळ, युवा नेते नितीन मिसाळ, शेखर मिसाळ, सचिन खिलारे, यांच्यासह आदी मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
मौजे कदमवाडी येथील ग्रामसेवक श्री . शिंदे यांच्या कार्यकाळातील कदमवाडी या ठिकाणची संपूर्ण दफ्तर चौकशी करण्यात यावी . तसेच त्यांच्या कार्यकाळात दलितवस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी कारण दि.22/8/2022 रोजी कदमवाडी या ठिकाणची तहकूब झालेल्या ग्रामसभेतून सरपंच, ग्रामसेवक यांनी झालेल्या कामांची ग्रामस्थांनी माहिती विचारली असता चक्क ग्रामसभेतून पळ काढला कारण भर ग्रामसभेतून पळ काढला म्हणजे नक्कीच सरपंच आणि ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार केल्याचे निदर्शनास येत आहे? तसेच रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहीरींचीदेखील चौकशी करण्यात यावी या सर्व प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात संगनमताने भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. अशा आशयाचे निवेदन देण्यात आले होते निवेदनाची दखल न घेतल्याने दलित महासंघांचे संस्थापक अध्यक्ष प्रा . डॉ . श्री . मच्छिंद्र सकटेसर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नेते दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे व दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी दि. ०८ / ० ९ / २०२२ रोजी तीव्र स्वरूपात पंचायत समिती माळशिरस या कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन केले.
जोपर्यंत निवेदनाच्या अनुषंगाने श्री शिंदे भाऊसाहेब यांच्या कार्यकाळातील कदमवाडी येथील दप्तर चौकशी, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत झालेल्या सर्व कामांची चौकशी व रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींची चौकशी केली जात नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार वेळ पडल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व विभागीय आयुक्त पुणे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडले जाणार .
सचिन रणदिवे -
दलित महासंघ पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस
Comments
Post a Comment