#Indapur:हर्षवर्धन पाटील यांनी नंदिकेश्वर मंदिरात अनुभवला श्रीमहाकाल नवनिर्माण लोकार्पण लाईव्ह सोहळा!
निरवांगी नजीक दगडवाडी येथे शेकडो नागरिकांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उज्जैन येथे सोहळा संपन्न!
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरवांगी नजीक दगडवाडी येथील नंदिकेश्वर मंदिरामध्ये मोठ्या स्क्रीन द्वारे उज्जैन येथील श्रीमहाकाल मंदिर नवनिर्माण ( कॅरिडोर ) लोकार्पण लाईव्ह सोहळा शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि.11) सायंकाळी अनुभवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीमहाकाल लोक कॅरिडोर लोकार्पण सोहळा धार्मिक व उत्साही वातावरण संपन्न झाला.
उज्जैन ( मध्य प्रदेश) येथे 856 कोटी रुपये खर्च करून सुमारे 47 हेक्टर क्षेत्रावर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. उज्जैन येथील श्रीमहाकालेश्वर मंदिर हे देशातील एक ऐतिहासिक व जागतिक प्रसिद्धी लाभलेले जोतिर्लिंग आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.
श्रीमहाकाल मंदिर नवनिर्माणमध्ये भगवान शंकराचे भव्य कलाकृती, थीम पार्क, हेरिटेज मॉल आदीच्या माध्यमातून अलौकिक विश्वाचे दर्शन होणार असून या काॅरिडोरला 'महाकाल लोक' असे नाव देण्यात आले आहे. या 900 मी. लांबीच्या कॅरीडोरचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धार्मिक व उत्साही वातावरणात संपन्न झाले. इंदापूर तालुक्यातील प्राचीनकालीन श्रीनंदिकेश्वर मंदिरातून लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची सुविधा भाजपच्या वतीने मोठी स्क्रीन लावून करण्यात आली होती. या लोकार्पण कार्यक्रमाच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील यांनी श्री नंदिकेश्वर मंदिरात पूजा व आरती करून दर्शन घेतले. यावेळी नागरिक तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment