#Parbhani:शेषराव सोपणे मामा यांचा परभणी येथे व्यापारी बांधवांकडून सत्कार

महादरबार न्यूज नेटवर्क -
श्री शेषराव सोपणे मामा यांची अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख पदी निवड झाल्याने,अ.भा.पोलीस हक्क संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांच्या उपस्थितीत परभणी येथे व्यापारी बांधवांकडून सत्कार.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री माऊली वैद्य संचालक हरिओम कृषि भांडार परभणी,
अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननिय श्री श्रीनिवास इंदुरकर यांनी श्री शेषराव सोपणे मामा यांच्या सामाजिक कार्य, संघटना बांधणीसाठी तत्परता, तसेच संघटनेच्या कार्याची वेळोवेळी जनसमान्यापर्यंत माहिती पोहोचवून, अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेला प्रसिध्दी देण्यासाठी प्रयत्न केले असल्याने, श्री शेषराव सोपणे मामा यांची महाराष्ट्र राज्य प्रसिध्दी प्रमुख पदी निवड करण्यात आली असल्याने, परभणी येथील नवामोंढा येथे व्यापारी बांधवांनी सत्कार केला.

यावेळी श्री माऊली वैद्य संचालक हरिओम कृषि भांडार परभणी,प्रमुख व्याख्याते विनोदअण्णा भोसले प्रदेशाध्यक्ष अ. भा. पोलीस हक्क संरक्षक संघटना महाराष्ट्र, प्रसाद आरमळ जिल्हा उपाध्यक्ष सिडस् फर्टीलायझर व्यापारी असोसिएशन, साहेबराव भंडे तालुकाध्यक्ष पोलीस हक्क संरक्षक संघटना पालम,बालाजी चौधरी जिल्हा उपाध्यक्ष सिडस् पेस्टीसाईड & फर्टीलायझर एम्प्लॉइज असोसिएशन परभणी,तुकाराम पुके इत्यादी व्यापारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम