Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:आ राम सातपुते यांच्या प्रयत्नांने माळशिरस व नातेपुते येथील बस स्थानके होणार चकाचक


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस तालुक्यातील माळशिरस व नातेपुते या महत्त्वाच्या शहरातील बस स्थानके ही मोडखळीस आली असून या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून ही बसस्थानके बीओटी तत्त्वावर करून मिळणे बाबत माळशिरसचे आ राम सातपुते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2 ऑगस्ट रोजी पत्र दिले होते या पत्राची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन या पत्रावर सही करून मागणी मंजूर केल्याने माळशिरस व नातेपुते या ठिकाणची बस स्थानके आ. राम सातपुते यांच्यामुळे चकाचक होणार असल्याने या भागातील नागरिकांमधून समाधानाचे वातावरण आहे.

माळशिरसचे आ. राम सातपुते हे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत सातत्याने आग्रही भूमिका घेत असून यापूर्वीच त्यांनी मागील आठ दिवसांपूर्वी माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी आणला असून 2 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आ राम सातपुते यांनी पत्र दिले असून या पत्रामध्ये त्यांनी माळशिरस तालुक्यातील माळशिरस व नातेपुते हे आळंदी- पंढरपूर पालखी महामार्गावरील दोन महत्त्वपूर्ण गावे असून या गावांची लोकसंख्या जवळपास 80 ते 90 हजार असून  नातेपुते या गावाजवळच श्री शंभू महादेवाचे शिखर शिंगणापूर हे गाव आहे याचबरोबर जैन धर्माचे क्षेत्र असणाऱ्या दहीगाव येथील प्रसिद्ध मंदिर याच रस्त्यालगत आहे नातेपुते व माळशिरस या ठिकाणी नागरिकांची सतत वर्दळ असते याशिवाय आजूबाजूची तालुक्याची गावे या दोन्ही गावांना जोडली आहेत तर माळशिरस हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे आजूबाजूची खेडी व शहरे माळशिरसशी मोठ्या प्रमाणात जोडली असून या गावांशी शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या सतत संपर्क असल्याने या गावाचा सातत्याने विस्तार वाढत आहे त्यामुळे या गावातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व प्रवासी यांची सतत वर्दळ असते.

परंतु नातेपुते व माळशिरस येथील ही दोन्ही बस स्थानके फार जुनी असून मोडकळीस आलेली आहेत यामुळे या ठिकाणी प्रवास करणाऱ्या सर्वांनाच ऊन, वारा, पाऊस याचा त्रास सहन करावा लागत आहे तरी माझ्या माळशिरस मतदारसंघातील माळशिरस व नातेपुते या दोन्ही गावातील बसस्थानके बीओटी तत्त्वावर मंजूर करून मिळावी असा त्यांनी पत्रात उल्लेख केला होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रावर तात्काळ मंजूर असा शेरा मारून या कामास मंजुरी दिल्याने तालुक्यात समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे माळशिरसचे आ. राम सातपुते यांच्यामुळे निधी मिळविण्याच्या बाबतीत माळशिरस तालुक्याला नेहमीच झुकते माप मिळत असून नातेपुते व माळशिरस या ठिकाणची बस स्थानके बीओटी तत्त्वावर मंजूर करून मिळणे बाबत पत्र दिले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ या कामास मंजुरी दिल्याने आ राम सातपुते पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात जास्तीचा निधी खेचून आणण्यात यशस्वी झाले आहेत .

Post a Comment

0 Comments