#Yavat:पांढरे कुटुंबीयांची खाडे बालक आश्रमाला मदत
महादरबार न्यूज नेटवर्क - संतोष जगताप
हंडाळवाडी -केडगाव ता दौंड येथील पार्वती विठोबा पांढरे यांच्या स्मृती दिनानिमित्त पांढरे कुटुंबीयांनी गलांडवाडी ता दौंड येथील खाडे बालक आश्रमाला मदत केली. विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. यावेळी एक दिवसाचा खर्च २५०० रुपयांचा धनादेश यावेळी दिला.
यावेळी दौंड बाजार समिती माजी सभापती दिलीप हंडाळ, संदीप पांढरे, बाळासाहेब महारनोर, रामदास पांढरे, सावळा हाके, गणेश पांढरे, संदीप हंडाळ, प्रवीण पांढरे, अधीक्षक बापू गोफने, बापू बडे, तानाजी दाखले उपस्थित होते. गेल्या २२ वर्षापासून खंडेराव खाडे व प्रमिला खाडे हे दाम्पत्य अनाथ मुलांचे संगोपन शासकीय मदतीशिवाय करीत आहेत. या संस्थेतून अनेक विद्यार्थी घडून गेले आहेत.
गेल्या महिन्यात देखील अनेकांनी संस्थेस मदत केली. कानिफनाथ जेधे पारगाव सा. मा. ता. दौंड यांचा मुलगा गणेश जेधे याच्या वाढदिवसानिमित्त मुलांना एकवेळचे जेवण दिले. महेश डचंदुलाल शहा पुणे यांनी अमृत महोत्सवी स्वतंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पाडून संस्थेस १० हजार रुपये देऊन संस्थेस मदत केली. बलवंतसिंह चतुरसिंह जाला आनंदनगर, चौफुला यांनी संस्थेचे एक दिवसाच्या जेवनाच्या खर्चासाठी २५०० रुपये दिले. पोपट विठोबा भापकर, पुणे यांनी त्यांच्या राज या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मुलांना एक वेळचे जेवण दिले. डॉ. प्रज्ञा विजय भवारी, चाकण यांनी मुलांच्या शालेय युनिफॉर्म साठी २५ हजार दिले.
Comments
Post a Comment