Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:भार्गवी वाघमोडे हि प्लास्टिक मुक्त व व्यसनमुक्त भारत या राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत प्रथम

महादरबार न्यूज नेटवर्क  -
विजयादशमीच्या औचित्याने सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सिंगल यूज प्लास्टिक मुक्त भारत (प्लास्टिक बंदी) व व्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी आपट्याच्या पानावर चित्र काढणे ही ऑनलाईन राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. 
       
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला धोका आहे.जगभरातील प्लास्टिकच्या पिशव्या समाप्त करण्यासाठी सुमारे एक हजार वर्षे लागतील.प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे दरवर्षी सुमारे एक लाख प्राणी मरत असतात.याबाबत तळागाळात जनजागृती होणे अपेक्षित आहे.तसेच भारतात तंबाखू सेवनाचे प्रमाण जास्त आहे.धुम्रपान व तंबाखूमुळे कँन्सर सारखे आजार जडतो.धुम्रपानामुळे जगातील  ११% लोकांचा मृत्यू होतो.याबाबत शालेय जीवनात व समाजात जनजागृती व्हावी म्हणून सृजन संस्थेने हे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेतर्फे आवाहन केले होते.

या स्पर्धेत महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता . त्यात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मधील  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील  इयत्ता सातवीतील भार्गवी वाघमोडे  हिचा प्रथम क्रमांक आला आहे.तिला शाळेचे कलाशिक्षक के.के.शिंदे सर यांचं मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      
सदरील स्पर्धा ही आँनलाईन पद्धतीने राबविण्यात आली.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र व गुणवंत विद्यार्थ्यांना फोन पे द्वारे रोख रक्कम व गुणवत्ता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
      
वरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किरण खमितकर, सलिम आतार,बस्वेश्वर थोटे,अविनाश धडे,मल्लिकार्जून खळुरे,दीपक जगताप,शिवकुमार पवार,नदीम सय्यद,बस्वेश्वर थोटे आदिचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments