#Yavat:वृत्तपत्र विक्रेते हे वृत्तपत्र सृष्टीतील महत्वाचे घटक - एम.जी. शेलार

महादरबार न्यूज नेटवर्क  - संतोष जगताप
वृत्तपत्र क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेते  हे  वृत्तपत्र पत्रकार आणि सर्व सामान्य वाचक यामधील महत्वाचे घटक आहे. असे मत जेष्ठ पत्रकार एम.जी. शेलार यांनी यवत येथील वृत्तपत्रक विक्रेते मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

यवत आणि दौंड मधील सर्व पत्रकार संघाचे वतीने यवत येथील जुने वृत्तपत्र विक्रेते गुजर बंधू यांचा जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिना निमित्त सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
यावेळी मिनेश गुजर आणि राजू गुजर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन  सत्कार केला.

यावेळी बोलताना शेलार पुढे म्हणाले, गुजर बंधू हे यवत परिसरातील जुने वृत्तपत्र विक्रेते आहेत, थंडी वारा आणि पाऊस असो अंत्यत खडतर परिस्थितीत त्यांनी वृत्तपत्र लोकांना वेळेत देण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत, आजही करीत आहेत.त्यांच्या कष्ट आणि प्रयत्न यामुळे वेळेत पेपर मिळत आहे.आज थोडी त्यांचे विषयी आपुलकी म्हणून त्यांचा सत्कार करण्याची  संधी मिळणे हे आनंददायक आहे.

यावेळी संतोष जगताप, राहुल अवचट, मनोज खंडांगले,  विनायक दोरगे, अनिल गायकवाड, विजय कदम,सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बबन गायकवाड,सागर मिठाईवाले हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम