#Indapur:पिंपरी बुद्रुक येथे लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नानासाहेब आटोळे यांची उपस्थिती
पिंपरी गावच्या सर्व धार्मिक क्षेत्रामध्ये नेहमीच मदतीचे सहकार्य करीत राहीन - विद्यमान सरपंच श्रीकांत बोडके
महादरबार न्यूज नेटवर्क - बाळासाहेब सुतार
पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथे सालाबाद प्रमाणे भावार्थ रामायणाचे पारायण पहिल्यांदाच चालू आसल्याने या मधील लक्ष्मण शक्ती सोहळा संपन्न झाला.
भावार्थ रामायण ग्रंथ व कलश पूजन सोहळ्यासाठी पिंपरी बुद्रुक गावचे विद्यमान सरपंच श्रीकांत शिवाजी बोडके व पोलीस पाटील वर्धमान बोडके, माजी सरपंच आबासाहेब बोडके, चेअरमन निलेश बोडके, तसेच गावातील भाविक भक्त यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
लक्ष्मण शक्ती सोहळ्यासाठी बावडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी नानासाहेब आटोळे यांनी नतमस्तक होऊन दर्शन व आशीर्वाद घेतला. पिंपरी गावच्या वतीने त्यांचा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, रात्रभर रामायण कथेचे वाचन करून पहाटे 6 वाजता नामाच्या जयघोषात लक्ष्मण शक्ती सोहळा श्रीफळ फोडून पार पडला. या कार्यक्रमासाठी वाचक आणि सूचक नरसिंहपूर, टणु, गिरवी, गोंदी, सराटी, ओझरे, गारअकोले,टाकळी, गणेशवाडी, पिंपरी बुद्रुक, या सर्वच भागातून मोठ्या संखेने उपस्थितीत राहुन लक्ष्मण शक्ती सोहळ्याला शोभा आली.या सोहळ्यासाठी वाचक 50 हून अधिक तर सुचक 30 ते 35 होते. ग्रंथ ऐकण्यासाठी भाविक भक्त पुरुष व महिला सहित 200 हून अधिक श्रोते उपस्थित होते.
लक्ष्मण शक्ती सोहळ्यातील भाविकांना रात्री भोजन व सकाळी महाप्रसादाची व्यवस्था सरपंच श्रीकांत बोडके यांच्या वतीने करण्यात आली,
ग्रंथ वाचक व सूचक संदिपान पडळकर, श्रीमंत भोसले, महादेव सुतार, सोमनाथ सुतार, बाळासाहेब घाडगे, वर्धमान बोडके, काकडे महाराज, यांना माजी चेअरमन आशोक दगडु बोडके, यांच्या वतीने संपूर्ण कपड्याचा पोशाख घेण्यात आला.या शतकात पहिल्यांदाच भावार्थ रामायण ग्रंथ पिंपरी बुद्रुक येथे चालु केल्यामुळे शेकडो भावीक भक्त व वाचक सूचक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन संदिपान पडळकर व बाळासाहेब घाडगे, यांच्या सहित पिंपरी बुद्रुक येथील सर्व भावीक भक्त यांच्या सहकार्याने करण्यात आले.
Comments
Post a Comment