#Natepute:शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांचे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे नातेपुते हद्दीतील विविध कामांसाठी निवेदन
महादरबार न्यूज नेटवर्क -
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे माळशिरस तालुका शिवसेनेचे (शिंदे गट) तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये डीपीडिसी मधून महत्वाच्या विविध कामांना मंजुरी मिळून सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांच्याकडे वर्ग करण्याची भेटून निवेदनाद्वारे मागणी केली असून मागणी केलेली कामे नातेपुते मांडवे रस्ता पाचशे मीटर काँक्रीट रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मांडवे हजार मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मांडवे पंधराशे मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मेडद पाचशे मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते मेडद हजार मीटर काँक्रीट रस्ता करणे ९.९०लक्ष, नातेपुते मेडद पंधराशे मिटर काँक्रीट रस्ता करणे ९.९०लक्ष, नातेपुते मेडद दोन हजार मीटर काँक्रिटी रस्ता करणे ९.९० लक्ष, नातेपुते बाजार तळ येथे काँक्रीट करणे ९.९० लक्ष रकमेची एकूण पाच कामे, तुळशी स्वीट होम ते पोलीस स्टेशन काँक्रिटी रस्ता करणे ४० लक्ष, शंकर नगर ते हायवे काँक्रिटी रस्ता करणे २० लक्ष, सद्गुरु कॉलनी प्रभाग क्रमांक पाच काँक्रिटी रस्ता करणे २० लक्ष, सद्गुरु कॉलनी प्रभाग क्रमांक पाच अंडरग्राउंड गटर करणे २० लक्ष,
तसेच नातेपुते येथे लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर आहेत त्यास कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे व्यवसाय अडचणीत आलेले आहेत जिल्हा नियोजन समिती मधून नातेपुते येथील कुंकारे एडिशनल डीपी, हिवरकर डीपी १०० केव्हीए आहे तो २०० केव्हीए करणेबाबत, फोंडशिरस येेेेथील बोडरे वस्ती येथे ॲडिशनल डीपी करणे बाबत, फोंडशिरस पवार वस्ती येथे ऍडिशनल डीपी तयार करणे बाबत
तसेच नातेपुते येथे मुस्लिम समाज मोठ्यााा प्रमाणात आहे त्यांचेेे धार्मिक कार्यक्रमासाठी लग्न समारंभासाठी कोणतीही सोय नाही त्यासाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून शादी खान साठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात यावेत अशी मागणी शिवसेना माळशिरस तालुकाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी केली आहे.
यावेळी नातेपुते शिवसेना गटनेते दादाभाई मुलानी ,जावेद शेख ,संतोष गोरे शाखाप्रमुख फोंडशिरस, राजू मुलानी इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment