#Natepute:धर्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी रेंगाळलेली शासकीय योजना सुरू करण्यास प्रशासनास पाडले भाग

भीम नगर येथील पाणी प्रश्न मिटणार

महादरबार न्यूज नेटवर्क -
धर्मपुरी येथील धर्मपुरी शिंदेवाडी रोडवरील भीम नगर येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची खूप मोठी अडचण होती.
गेली 40 वर्षे भिम नगर येथे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा गंभीर प्रश्न होता 2018 मध्ये 14 वित्त आयोगांमधून  साडेसहा लाख रुपये मंजूर असून सुद्धा आत्तापर्यंत या योजनेची अंमलबजावणी झालेली नव्हती.

शासन स्तरावरून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदीप झेंडे, संजय झेंडे, शहाजी मदने, गजानन पाटील ,नामदेव निटवे, भागोजी माने , किरण पाटील, सचिन पाटील यांनी सतत भीम नगर पाणी प्रश्नाचा पाठपुरावा करून आज तो प्रश्न मार्गी लागलेला आहे.

2018 मधील 14 वा वित्त आयोगामधून साडेसहा लाखाची योजना ग्रामपंचायत मार्फत राबवत त्या बोरमध्ये मोटर टाकून पाईपलाईन द्वारे भीमनगर मधील नागरिकांना पाण्याची सोय करण्यात येणार आहे. दिनांक 5/12/2022 रोजी त्या योजनेचे उद्घाटन प्रशासक सरवदे साहेब,उपसरपंच सुनिता माने यांनी केले.

यावेळी ग्रामसेवक साळवे मॅडम, ग्रामपंचायत मा. सरपंच विजय पाटोळे, ग्रा. सदस्य गजानन पाटील, ग्रा. मा.सदस्य शहाजी मदने संजय झेंडे ,प्रदीप झेंडे,शंकर मसुगडे, नारायण बोडरे, गंगाराम झेंडे ग्रामपंचायत कर्मचारी आणि भीमनगर मधील ग्रामस्थ , महिला इ उपस्थित होते.

उद्योगपती शेळके साहेब यांच्या माध्यमातून त्यांनी स्वखर्चातून बोर पाडून दिली आहे. त्यामध्ये आता 14 वा वित्त आयोगातून पाईपलाईन करून पाईपलाईन करून भीम नगर मधील सर्व नागरिकांना त्यांच हक्काचे पाणी मिळणार आहे.
प्रदीप झेंडे 
सामाजिक कार्यकर्ते धर्मपुरी.

 

Comments

Popular posts from this blog

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत

#Natepute लक्ष्मीआई यात्रेनिमित्त शिदेंवाडीत कार्यक्रम