Hot Posts

6/recent/ticker-posts

#Malshiras:डॉ.आप्पासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांना यश माळशिरसनगर पंचायत साठी ॲम्बुलन्स मंजूर


महादरबार न्यूज नेटवर्क -
माळशिरस हे गाव तालुक्याचे ठिकाण आहे माळशिरस शहराची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच महाराष्ट्र शहर हे मोठ्या प्रमाणात विखुरलेले आहे शहरांमध्ये काही अपघात घडला असता किंवा रुग्णांना तात्काळ  अकलूज किंवा इतर दवाखान्यात नेण्यासाठी नगरपंचायत कडे ॲम्बुलन्स नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे तसेच अति आवश्यक अकलूज वरून ॲम्बुलन्स मागवावी लागते त्यात बराचसा वेळ जातो व कधीकधी रुग्णांना आपले प्राण हे गमवावे लागत आहे त्यामुळे माळशिरस नगरपंचायत कडे  सर्व सेवा युक्त कार्डियाक  ॲम्बुलन्स असणे आवश्यक आहे.

त्यासाठी नगराध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब देशमुख यांनी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे पत्रव्यवहार  करून खासदार  निधीतून सर्व सोयीयुक्त कार्डियाक ॲम्बुलन्स द्यावी अशी पत्रव्यवहार करून मागणी केली होती त्याला यश मिळाले असून लवकरच माळशिरस नगरपंचायत कडे सर्व सोयीयुक्त कार्डियाक अंबुलन्स उपलब्ध होणार असल्याचे नगराध्यक्ष डॉ.आप्पासाहेब देशमुख यांनी सांगितले आहे. त्यामुळे माळशिरस मधील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments