महादरबार न्यूज नेटवर्क -
कोर्टी तालुका पंढरपूर येथे दिनांक - 7/1/ 2023 रोजी जिल्हा परिषद सोलापूर आयोजित जिल्हा परिषदेच्या शालेय मुलांच्या क्रीडा स्पर्धे अंतर्गत मोठा गट मुलींचा संघ कबड्डी या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा फडतरी तालुका माळशिरस प्रथम क्रमांक मिळवून यशस्वी झाला.
या संघाने केंद्र स्तर , बीट स्तर तालुकास्तर व जिल्हास्तर असा खडतर प्रवास करून घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल माळशिरस तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी देशमुख साहेब, विस्तार अधिकारी करडे साहेब, केंद्रप्रमुख वंसाळे तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ यांनी मिळालेल्या या यशाबद्दल कौतुक केले.
0 Comments