Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepte:हनूमान विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची 'इन्स्पायर अवॉर्ड’ साठी निवड


महादरबार न्यूज नेटवर्क -  
भारत सरकारतर्फे आयोजित प्रतिष्ठित 'इन्स्पायर अवॉर्ड' साठी शालेयस्तरावरील नवकल्पना असणाऱ्या विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाते. यावर्षीच्या  शिदेवाडी ता माळशिरस येथील रयत शिक्षण संस्थेच्या हनूमान विद्यालयातील शिवांजली मूळीक,जाधव,कादबंरी पवार या तीन विद्यार्थ्यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे.  इन्स्पायर अवॉर्डच्या अधिकृत वेबसाईटवरून या विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्येकी दहा हजार रुपये इतकी रक्कम या विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नवकल्पनेसाठी मिळणार आहेत.
      
भारताने जगाचे नेतृत्व करावे व विश्वगुरु बनावे यासाठी भारत सरकार इनोव्हेशन अर्थात नवकल्पनेवर लक्ष केंद्रित आहे करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या काही वर्षापासून भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.  विद्यार्थ्यांनी हे उत्तुंग यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना  सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.
       
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आखाडे,सुर्यवंशी,बापुराव मूळीक,राजेंद्र पवार,  यांच्यासह पालकांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

Post a Comment

0 Comments