महादरबार न्यूज नेटवर्क - जागृती माने
छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९३ वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठया उत्साहात साजरी झाली आहे. ज्यांच्या कीर्तीचा निनाद तीनशे पन्नास वर्षांनंतरही उभ्या जगात केला जातोय असा तमाम, रयतेच्या वाट्याला आलेल एक सत्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
कोविड नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी प्रमाणे सगळीकडेच साजरी केली जाते.मात्र यावर्षी जैनकवाडी गावातील या माहिलानी शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक काढून मोठ्या उत्सवाने साजरी केली पहिला मिळाली आहे.
या ठिकाणी गावातील अनेक महिलांचा यामध्ये सहभाग होता. यावेळी बारामती तालुक्यातील जैनकवडी या गावातील महिलांनी अगदी पारंपरिक पद्धतीने दिंडी काढली त्याचबरोबर लहान मुलांनी देखील यावेळी पोवाडे सादर करत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढली.
या संपूर्ण कार्यक्रमाचे आयाेजण शुभांगी पवार यांनी केले होते. यावेळी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन गावाच्या पोलीस पाटील साक्षी मिंड याच्यां हस्ते करण्यात आले. व त्यांनी छत्रपती शिवराय याचे विचार आपन मनामनामध्ये रूजवायला पाहिजे असे देखील त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पोहचवले. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनीता माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने मुली व महिला उपस्थित होत्या.
0 Comments