#Natepute:जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा संपन्न
महादरबार न्यूज नेटवर्क -
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा गुरुवार दि.२३ फेब्रुवारी २०२३ रोजी नातेपुते शहरात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील व शेजारी तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात महिलांचा तसेच युवक वर्ग सहभाग हे या लक्षवेदी ठरले.या कार्यक्रमासाठी नातेपुते नगरपंचायत नातेपुते यांचे विशेष सहकार्य मिळाले.
माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्हाचे शेवटचे शहर नातेपुते जे सोलापूर पासून १५० किलोमीटर अंतरावर असून जिल्हा शासकीय कार्यालय शासकीय योजनापासून दूर राहतात यांना योजनेची माहिती होण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम जनजागृती मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यात बँक,यशस्वी उद्योगजक तसेच मंडळाचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी ध्रुवकुमार बनसोडे साहेब यांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेविषयी नागरिकांना सविस्तर माहिती तसेच नागरिकांच्या अडचणी याबाबत नागरिकांना मार्गदर्शनही केले.पुढे बोलताना त्यांनी नागरिकांना आव्हान केले की,आपण कर्ज प्रकरण करुन देतो पैसाची मागणी करणारे दलाल यांच्यापासून सावध राहिले पाहिजे तसेच शासकीय अनुदान योजना विषयी कोणतीही माहितीसाठी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा अशा सूचना नागरिकांना केल्या.
या कार्यक्रमात नागरिकांना बँकेकडून कर्ज मिळण्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यक तसेच बँकेला काय पुरतता करणे आवश्यक आहे याविषयी बँकेचे प्रतिनिधी अक्षय भगत साहेब व्यवस्थापक, विदर्भ कोकण बँक नातेपुते, श्री रवींद्र प्रसाद बँक ऑफ इंडिया नातेपुते यांनी मार्गदर्शन केले.
नवीन उद्योजक होणाऱ्या नागरिकांसाठी प्रोत्साहन म्हणून यांनी त्यांच्या यशस्वी उद्योग कसा तयार होतो व यासाठी मंडळाचे कसे सहकार्य झाले याविषयी त्यांचे अनुभव सांगितले.तसेच यामध्ये यशदा चे प्रसिद्ध व्याख्याते नंदकुमार दुपटे सर यांनी नवीन उद्योजनक यांना नागरिकांना हसवत प्रोत्साहनपर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.
महिला बचत गटाचे अधिकारी शेंडे साहेब यांनी महिला बचत गटांना मंडळाकडून मिळणारे कर्ज व अनुदान यांची सविस्तर माहिती देऊन महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून यशस्वी उद्योग होणे आवश्यक आहे आणि यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योक मंडळाच्या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी पुढे आले पाहिजे असे सांगितले.
या जनजागृती कार्यक्रमाचे अध्यक्षा नातेपुते नगरपंचायत नगराध्यक्षा सौ.उत्कर्षाराणी पलंगे,प्रमुख पाहुणे डॉ.नरेद्र कवितके,नातेपुते पोलीस स्टेशचे सहा.पोलीस निरिक्षक संपागे साहेब, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बनसोडे साहेब,ज्येष्ठ सहाय्यक सज्जन कांबळे साहेब,सचिव माळशिरस दीपक शेळके ,चेअरमन दत्ता सावंत,सुपरवायझर आर.ए.शेख, मधुक्षेत्रीक श्री पलवेंचा, केंद्रप्रमुख विजयकुमार खडके, महिला बचत गट अधिकारी रणजीत शेंडें साहेब, भगवान धनंजय सर, श्री नाईक नवरे मोहोळचे यशस्वी उद्योजक श्री विष्णू थेटे, माळशिरसचे यशस्वी उद्योजक श्री रासकर तसेच
युवक युवती,महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सदर कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते विनायक सावंत सर, बिपीन सातपुते,नेहरु युवा मंडळाचे गणेश घुले यांनी केले.
Comments
Post a Comment