Hot Posts

6/recent/ticker-posts

#Pune:कसब्यात मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक आ.शेखर निकम यांचा झंजावात


महादरबार न्यूज नेटवर्क  - विलास गुरव
पुणे कसबा विधनासभा पोटनिडणूक २०२३ करिता महाविकासचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता कसबा पेठ येथे स्टार प्रचारक म्हणून वरिष्ठांकडून निवड झालेले चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार यांनी प्रचार दौरा केला तेथील नामदेव शिंपी समाजबांधव बैठकींमध्ये मार्गदर्शन करुन उमेदवार  रविंद्र घंगेकर यांना विजयी प्रचंड मताने विजयी करा असे अवाहन केले.


कसबा मतदार संघामध्ये आमदार शेखर निकम यांनी चिपळूण व संगमेश्वर विधानसभा मतदार संघातील येथे नोकरीसाठी स्थायिक झालेले ग्रामस्थ व सह्याद्रि शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी यांची भेटी घेऊन त्यांच्या बैठका घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या, त्यांना महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचाराकरिता मी येथे आलो आहे हे सांगून येथील असलेल्या समस्या यांच्या माध्यमातून सोडवू असे सांगितले. याबाबत विश्वास दिला आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना बहुमताने विजयी करा अशी आपल्या लोकांना मायेची साद घालून अवाहन केले. या हाकेला हाक देत आमदार शेखर निकम यांच्यावर जिवापार प्रेम करण्या-या लोकांनी आपण कायम तुमच्यासोबत आहोत असे सांगितले.


यावेळी उमेदवार रविंद्र घंगेकर, मा.आमदार मोहनदादा जोशी, काँग्रेस नेते धवलसिंह मोहिते पाटील, गणेश नलावडे, बाळासोहब देवळे,संदिप लुचळे, अनील सोंडकर, रुपेश पवार, अनिकेत थोरात, चेतन चव्हाण आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments