#Indapur:स्वाती शिंदे यांची इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड
महादरबार न्यूज नेटवर्क -
इंदापूर तालुक्यातील पवारवाडी येथील स्वाती शिंदे
यांची भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड .
स्वाती शिंदे यांना सामाजिक कामाची आवड असून त्या सामाजिक कामात नेहमीच अग्रेसर असतात.
त्यांच्या या कामाची दखल घेत भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेने शिंदे यांची तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी निवड केली आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघटनेचे , संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रदेश संतोष मनोहर कांबळे यांनी शिंदे यांना इंदापूर तालुका महिला आघाडी अध्यक्ष पदी
निवडीचे पत्र दिले आहे.
स्वाती शिंदे यांच्या निवडीने इंदापूर तालुक्यातील मित्र परिवार व नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment