#Mumbai:पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांच्या निधीवरील स्थगिती उठवा

आ. शेखर निकम यांची विधानसभेत मागणी


महादरबार न्यूज नेटवर्क - विलास गुरव
अर्थसंकल्प २०२३  चालू अधिवेशनामध्ये आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदार संघातील प्रश्न विधीमंडळामध्ये मांडताना  आमदार शेखर निकम   पर्यटन विषयी प्रश्न मांडताना कोकणातील पर्यटनाला चालना देताना समुद्र किना-यावरील पर्यटन विचारात न घेता द-या खो-यात असणा-या तीर्थक्षेत्रे, गडकिल्ले यांचा विचार पर्यटन दृष्टीने प्राधान्याने होऊन कोणतेही पक्षीय राजकारण न करता या कामांकरीता वितरीत निधीवरील स्थगिती उठवण्यात यावी.

श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथे रोप वे व अभयारण्य उभारावे जेणेकरुन जागतिक पर्यटनाला वाव मिळेल त्याचबरोबर कसबा येथील कर्णेश्वर मंदीराकडे पर्यटनाच्या दृष्टीने विचार व्हावा, कसबा  येथील छ. संभाजी महाराज येथे वास्तव्य असलेल्या देसाईवाडा शासनाने त्यांना मोबदला देऊन ताब्यात घेऊन संग्रहालय उभारावे तसेचे छ. संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणीसाठीचा निधीवरील शासनाने स्थगिती उठवावी.
कोकणातील खाडी किनारी असणा-या जैव पर्यटनाच्यादृष्टीने गोवळकोटच्यात खाडीमध्ये केरळच्या धरतीवर बॅक वॉटर पर्यटनाला चालना द्यावी.
पर्शुराम देवस्थान ते गोविंदगड रोप वे व्हावा.
साबरमती रिव्हर डेव्हलपमेंट फ्रंटच्या प्रमाणे नैसर्गिक साधन सामुग्रीचा वापर करुन वाशिष्ठी नदीवर चिपळूण शहर ते बहादूर शेख नाका व गोवळकोट धक्का प्रस्तावास केंद्रीय  मंजूरी मिळावी.
वाशिष्ठी नदीमध्ये मगरींचे वास्तव्य लक्षात घेता पर्यटनाच्या दृष्टीने क्रोकोडाईल पार्क ची उभारणी व्हावी.
कोकणातील कृषी पर्यटनाला चालना देताना बागायतदाराना लावण्यात येणारे AG Other दराने लावण्यात येणारे वीज बील न आकारता ते फक्त  AG दराने आकारावे.
कोकणातील नमन, जाकडी, भजन, किर्तन लोककलाकारांना इतर कलाकारांप्रमाणे मानधन मानधन द्यावे.
तालुक्याच्या ठिकाणी सांस्कृतिक भवन उभाराव
शैक्षणिक शिष्यवृत्तीचा विचार करता SC, ST समाजातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे पुर्ण स्कॉलरशिप दिली जाते त्याप्रमाणे कुणबी समाज्याच्या विचार करता OBC विद्यार्थ्यांना सुद्धा त्याप्रमाणे पुर्ण स्कॉलरशिप दिली जावी.

श्यामराव पेजे महामंडळाच्या कर्ज प्रक्रियेतील जाचक अटी शिथील करण्यात याव्यात.
दिव्यांग लोकांचा विचार करता त्यांना दाखले मिळवणेकरीता तालुकास्तरावर त्याबाबतचे कॅम्प लावले जावे जेणेकरुन त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागणार नाही
अल्पसंख्याक लोकांचा विचार करता UPSC MPSC चे विद्यार्थी परिक्षेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जातात त्याच्या सोईसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी अल्पसंख्याक वसतीगृह बांधण्यात यावी.
डोगराळ भागातील शाळेच्या विद्यार्थ्यांचा विचार करता शाळेत जाताना धनगर समाजातील विद्यार्थ्यांना रस्त्याअभावी दुरवर चालत जावे लागते तरी तेथे कोणत्या पक्षाचा आमदार आहे हा विचार न करता सर्व धनगर वाड्यातील रस्ते चांगल्या प्रकारे व्हावेत.
असे प्रश्न सभागृहात मांडून सभागृहाचे लक्ष वेधले.

Comments

Popular posts from this blog

#Karunde कारूंडे येथील भीषण अपघातात माय लेकरांसह चार जण ठार, तिघे गंभीर जखमी

#Pune:वनाझ परिवार विद्यामंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

#Natepute महारूद्र परजणे यांचा सिंघमस्टाईल पाठलाग,रोडरोमियोंना बसली दहशत