#Natepute:मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या वरील भ्याड हल्याचा माळशीरस तालुका मनसेच्या वतीने जाहीर निषेध
महादरबार न्यूज नेटवर्क : -
मनसेचे नेते संदीप देशपांडे हे सकाळी मॉर्निग वॉक ला छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर येथे गेलेले असताना अज्ञात लोकांनी त्यांच्या वर हल्ला चढवला त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते त्यांना बाकी लोकानी हॉस्पीटला नेहले आहे सध्या त्यांची प्रकृती स्थीर आहे.
सदर घटनेचा जाहीर निषेध मनसे माढा लोकसभा मतदारसंघ मनसे माळशिरस तालुका व मनसे नातेपुते शहरच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध नातेपुते पोलीस स्टेशन ला निवेदन देऊन करण्यात आला.
सदर निवेदन नातेपुते पोलीस स्टेशनचे पोलीस अधीकारी प्रवीण संपागे साहेब यांनी स्वीकारले व त्यावेळेस त्यांनी सांगीतले मी आपल्या सर्व पदाधीकारी यांच्या भावनाचा आदर ठेवत शासनाला तातडीने संपुर्ण अहवाल पाठवतो.
यावेळी निवेदन देताना मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, मनसे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे, मनसे नातेपुते मनसे शहर अध्यक्ष संतोष देवकाते पाटील, विध्यार्थी सेना अक्षय बावकर, नातेपुते शहर प्रसिद्धी प्रमुख दादा भांड, गिरवी शाखा अध्यक्ष सुभाष नरुटे, सचीन नरुटे इत्यादी उपस्थीत होते.
Comments
Post a Comment