Hot Posts

6/recent/ticker-posts

#Natepute:राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची नियुक्ती


महादरबार न्यूज नेटवर्क -
भारतातील पहिले मित्र संघटन म्हणजे ऑल जर्नालिस्ट अॅण्ड  फ्रेंड्स सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी दि.०४/०३/२०२३ रोजी या संघटनेचे संस्थापक मा.यासीन पटेल साहेब व केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी साहेब, केंद्रीय सचिव बाळकृष्ण कासार साहेब या केंद्रीय कार्यकारणी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा.श्री.ईश्वर हुलवान यांनी मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले यांची सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती केली.


नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय उपाध्यक्ष मा.श्री. गणेश गोडसे साहेब तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मा.श्री.श्रीकांत बाविसकर साहेब यांनी शिफारस केली होती. मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी आठवले हे साप्ताहिक बहुजन मित्र, बहुजन भूषण वृत्तपत्राचे, सडेतोड, निर्भीड, जहालवादी, मवाळवादी, विचारवंत संपादक पत्रकार म्हणून महाराष्ट्रात ओळखले जात आहेत.  हे "शोधपत्रिका" करीत असून जे दिसेल, जे अनुभवले, जे पाहिले यावरतीच रोखठोक लिहीत असतात. त्यांनी यापूर्वी अनेक सामाजिक, राजकीय पक्षात काम केले आहे. त्यांची ही स्वत:ची बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटना आहे. अन्याय विरुद्ध लढा देण्यासाठी सदैव जागरूक असतात. या AJFC संघटनेत यापूर्वीही चांगले काम केले आहे. अभ्यासूवृत्तीने अधिकारी यांनी घाम फोडत असतात. त्यांचा अॅट्रोसिटी अॅक्ट, माहिती अधिकार कायदा, सरकारी कामात अडथळा कायदा, दफ्तर दिरंगाई कायदा यावरती त्यांचा गाढा अभ्यास आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य ते पंतप्रधान पदापर्यंतची कर्तव्य काय असतात त्याचाही अभ्यास आहे. "अन्याय करणार्‍यांचा ते कर्दनकाळ" म्हणून ही त्यांची ओळख आहे. ते उच्च शिक्षित, निर्व्यसनी, असंख्य पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. प्रत्येकाचा आदर करणारे व्यक्तिमत्त्व आहे. जो पर्यंत शांत तो पर्यंत शांत, एकदा सटकली की परत माघारी घेत नाहीत. हा त्यांचा गुण आहे. संविधानाने जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसार अधिकार व हक्क यासाठी जनतेसाठी झटत आहेत. "संघर्ष आणि झुंज" त्यांच्यासाठी मौल्यवान ठरत आहे.

आठवले यांच्या निवडीमुळे महाराष्ट्रातून विविध शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना, राजकीय पक्षाचे पदाधिकारी व इतर लहान थोर यांच्याकडून यांचे कौतुक तसेच सर्वत्र अभिनंदन होत आहे.

माझ्यावरती वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी पार पाडेन, त्या जबाबदारीला कुठेही तडा जाऊ देणार नाही. ही पत्रकार संघटना सोलापूर जिल्ह्यात नावारूपाला आणेन. पत्रकार व जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या संघटनेचा उपयोग करेन.
मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले 

Post a Comment

0 Comments